TRENDING:

अंगाला हळद हातावर मेहंदी, निवडणुकीत का चर्चेत आली अंकिता, सप्तपदीआधीचे 7 PHOTO

Last Updated:
अंकिता विनोद शर्मा हिने लग्नाआधी नवरीच्या वेशात माजलगाव नगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. तिच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर आणि गावात कौतुक होत आहे.
advertisement
1/7
अंगाला हळद हातावर मेहंदी, निवडणुकीत का चर्चेत आली अंकिता, सप्तपदीआधीचे 7 PHOTO
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्या दरम्यान सध्या अंकिता नावाची तरुणी चर्चेचा विषय बनली आहे. तिचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे मतदानाचा जल्लोष सुरू असताना या अंकिताची चर्चा इतकी का रंगली आहे आणि तिचे हे फोटो पाहून लोक कौतुक का करत आहे ते समजून घेऊया.
advertisement
2/7
अंगावर हळद, हातावर बांगड्या चढल्या, अंगावर नवरीचे कपडेही चढले आणि तयार होऊन नवरीमुलगी मंडपात जाण्याऐवजी थेट मतदान केंद्रावर पोहोचली. नववधूच्या अंगाला हळद लागली असताना मंडपात जाण्याऐवजी थेट मतदान केंद्रावर आल्याने चर्चा झाली.
advertisement
3/7
या नववधूचं नाव अंकिता आहे. अंकिताने आधी मतदान केंद्र गाठलं. आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. आपलं एक मत फार महत्त्वाचं आहे आणि ते वाया जाऊ नये यासाठी अंकिता थेट नवरीच्या वेशात लग्नाआधी मतदानाला पोहोचली.
advertisement
4/7
अंकिताने आधी मतदानाचा हक्क बजावला. आधी मतदान मग लग्न ही भावना त्यावेळी तिच्या मनात होती. मतदानाचा हक्क बजावून तिने मंडप गाठलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आणि गावात तिची चर्चा सुरू आहे. सगळीकडे तिचं कौतुक केलं जात आहे.
advertisement
5/7
आज माझ्या मुलीचं लग्न आहे. दुपारी दीड वाजता, तिने मला विचारलं की आधी मला मतदान करायचं आहे मग मी लग्नाला उभी राहीन, त्यावर तिच्या वडिलांनी तिला परवानगी दिली. त्यानंतर ती मतदान केंद्रावर पोहोचली. तिने मतदानही केलं.
advertisement
6/7
तिला माहिती आहे मतदानाचा हक्क फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी ती लग्नाआधी येऊन मतदान करायला तयार झाली. सगळं काही सोडून मतदान करायला आली अशी प्रतिक्रिया अंकिताच्या म्हणजे मुलीच्या वडिलांनी दिली आहे. मुलीने घेतलेल्या निर्णयाचा तिच्या कुटुंबियांना अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं.
advertisement
7/7
बीडच्या माजलगाव नगरपालिका निवडणुकीत लग्न अगोदर नवरीने मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही समृद्ध करण्यासाठी मतदान महत्त्वाचा आहे असा संदेशही दिला आहे. अंकिता विनोद शर्मा असं नवरीचे नाव आहे. बोहल्यावर चढण्या अगोदर तिने मतदानाचा हक्क बजावला..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
अंगाला हळद हातावर मेहंदी, निवडणुकीत का चर्चेत आली अंकिता, सप्तपदीआधीचे 7 PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल