TRENDING:

12 तासांत 10,500 रुपयांनी महाग झाली चांदी, सोन्याचे दर कुठे पोहोचले? जळगावच्या सराफ बाजारातून अपडेट

Last Updated:
जळगावच्या बाजारपेठेत चांदी २ लाख ३२ हजार ५०० रुपये किलोवर, सोनं १ लाख ३८ हजार ३०० रुपये तोळ्यावर पोहोचले. दरवाढीमुळे ग्राहक व व्यापारी चिंतेत.
advertisement
1/6
12 तासांत 10,500  रुपयांनी महाग झाली चांदी, सोन्याचे दर कुठे पोहोचले?
जळगाव, नितीन नांदुरकर: देशाची सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या बाजारपेठेत शुक्रवारी मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा मोठा परिणाम स्थानिक दरांवर झाला असून, एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल १०,५०० रुपयांची अवाढव्य वाढ झाली आहे.
advertisement
2/6
सोन्याच्या दरातही १,४०० रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारच्या दरवाढीनंतर चांदी आता २ लाख ३२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
advertisement
3/6
विशेष म्हणजे, यावर जीएसटी (GST) लागू केल्यानंतर ग्राहकांना एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी आता २ लाख ३९ हजार ४७५ रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीची ही घोडदौड पाहता ती लवकरच अडीच लाखांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
4/6
दुसरीकडे, सोन्यानेही १ लाख ४० हजारांच्या दिशेने कूच केली आहे. १,४०० रुपयांच्या वाढीनंतर सोन्याचे दर १ लाख ३८ हजार ३०० रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम) झाले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने दागिन्यांची मागणी मोठी आहे.
advertisement
5/6
मात्र, दररोज होत असलेल्या या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी, 'लग्नात दागिना हवाच' या परंपरेमुळे ग्राहक जळगावच्या बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. बजेट कमी असले तरी, गरजेनुसार थोड्याफार प्रमाणात दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
advertisement
6/6
दरवाढ होऊनही जळगावच्या सुवर्णनगरीतील विश्वासार्हतेमुळे खान्देशासह बाहेरूनही अनेक ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. मात्र, सततच्या या चढ-उतारामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. दरवाढीचा हाच वेग कायम राहिल्यास सर्वसामान्यांना सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे केवळ स्वप्नच उरेल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
12 तासांत 10,500 रुपयांनी महाग झाली चांदी, सोन्याचे दर कुठे पोहोचले? जळगावच्या सराफ बाजारातून अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल