TRENDING:

बाईपण भारी देवा! न घाबरता दोघींनीही धाडसाने सुरू केलं डॉग सेंटर, आता महिन्याला इतकी कमाई

Last Updated:
पाळीव प्राण्यांमध्ये कुत्र्यांना पाळण्याचे चलन हल्लीच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातही विदेशी प्रजातीची वेगवेगळी कुत्री घरामध्ये पाळण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे पाहायला मिळते.
advertisement
1/7
न घाबरता दोघींनीही धाडसाने सुरू केलं डॉग सेंटर, आता महिन्याला इतकी कमाई
आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळी पाळीव प्राणी पाळत असतो. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्र्यांना पाळण्याचे चलन हल्लीच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातही विदेशी प्रजातीची वेगवेगळी कुत्री घरामध्ये पाळण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे पाहायला मिळते.
advertisement
2/7
परंतु काही प्रजातीची कुत्री हिंस्र असल्याने त्यांना विशिष्ट अशा प्रशिक्षणाची देखील गरज असते. जालना शहरात राहणाऱ्या दोन महिला हेच काम करत आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रामध्ये गीतांजली देशमुख आणि मृगनयनी राजे या दोन महिलांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे
advertisement
3/7
जालना शहरापासून 12 किमी अंतरावर असलेल्या धावेडी या गावामध्ये गीतांजली देशमुख राहतात. मागील दहा वर्षांपासून त्या इथेच स्थायिक आहेत. तब्बल 25 वर्षे पतीच्या नोकरीनिमित्त मुंबईत राहिल्यानंतर त्या इथे स्थिरावल्या. लहानपणापासूनच प्राण्यांची आवड असल्याने मुंबईत असताना त्यांच्याकडे बरीच कुत्री होती.
advertisement
4/7
बाहेरगावी जायचे असल्यास त्यांना या कुत्र्यांची काळजी घेणार हक्काचे असे कोणी मिळत नसायचे. तेव्हा एका कार्यक्रमादरम्यान त्यांची मृगनयनी राजे यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतूनच पुढे कुत्र्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची कल्पना पुढे आली, असे गीतांजली देशमुख यांनी सांगितले.
advertisement
5/7
या प्रशिक्षण केंद्रामध्ये सर्व प्रजातींच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण देण्याचे काम हे मुख्यत्वे मृगनयनी राजे या पाहतात. तर ऍडमिनिस्ट्रेशनचे काम हे गीतांजली देशमुख पाहतात. आतापर्यंत या केंद्रावर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, इंदोर, नोएडा इत्यादी ठिकाणच्या ग्राहकांनी आपल्या घरच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे.
advertisement
6/7
कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रजातीनुसार 25 ते 25 हजार रुपये फी साकारली जाते तर त्यांच्या खाद्याचा खर्च हा वेगळा केला जातो. या माध्यमातून या दोन महिला महिन्याकाठी काठी 1 ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत. व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा प्राण्यांविषयी असलेल्या आवडीमुळे या व्यवसायाकडे वळल्याचे देशमुख यांनी सांगितले.
advertisement
7/7
हा व्यवसाय तसा आव्हानात्मक आहे. कुत्र्यांच्या बऱ्याच प्रजाती या अतिशय हिंस्र असतात. त्यामुळे ती चावण्याची देखील धोका असतो. या क्षेत्रामध्ये सगळीकडे पुरुष कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. परंतु आम्ही महिला असताना देखील विविध संकट आणि अडचणींचा सामना करून इथे तग धरून आहोत. अनेकदा हे बंद करावे असे विचार देखील डोक्यात आले. परंतु, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आम्ही या व्यवसायात टिकून असल्याचे गीतांजली देशमुख यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
बाईपण भारी देवा! न घाबरता दोघींनीही धाडसाने सुरू केलं डॉग सेंटर, आता महिन्याला इतकी कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल