TRENDING:

1 एप्रिलपासून लागू होणार नवा TDS रुल, FD-RD मधील गुंतवणुकदारांना मिळेल फायदा

Last Updated:
TDS Rules From April 1: 1 एप्रिल 2025 पासून लोकांना टीडीएसच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन टीडीएस नियमांच्या अंमलबजावणीमुळे एफडी गुंतवणूकदारांना अधिक फायदा होईल.
advertisement
1/7
1 एप्रिलपासून लागू होणार नवा TDS रुल, FD-RD मधील गुंतवणुकदारांना मिळेल फायदा
TDS Rules From April 1: केंद्रीय अर्थसंकल्प-2025 मध्ये, सरकारने कराशी संबंधित अनेक बदलांची घोषणा केली होती. या संदर्भात, कर वजावटीच्या स्रोतावर (टीडीएस) नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हा बदल 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. या बदलानंतर, फिक्स्ड डिपॉझिट (FD) करणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
2/7
TDS सोर्सवर कट केला जाणारा टॅक्स असतो. जेव्हा बँकेत एफडीवर मिळणारे व्याज एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त होते, तेव्हा बँकेला टीडीएस कापावा लागतो. ही लिमिट ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक नसलेल्यांसाठी वेगळी आहे. तुम्हाला वारंवार अनावश्यक टीडीएस कपातीचा सामना करावा लागू नये म्हणून या लिमिट्स तर्कसंगत करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव होता.
advertisement
3/7
ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन TDS लिमिट : ज्येष्ठ नागरिकांना फायदा व्हावा म्हणून, सरकारने व्याज उत्पन्नावरील टीडीएस लिमिट दुप्पट केली आहे. 1 एप्रिलपासून, जर एका आर्थिक वर्षात एकूण व्याज उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच बँकांकडून टीडीएस कापला जाईल. याचा अर्थ असा की, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचे एकूण व्याज उत्पन्न या मर्यादेत राहिले तर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही. हा नियम मुदत ठेवी (FD), आवर्ती ठेवी (RD) आणि इतर बचत साधनांमधून मिळणाऱ्या व्याजावर लागू होतो.
advertisement
4/7
सामान्य नागरिकांसाठी नवीन TDS लिमिट : सामान्य नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएसची लिमिट 40 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. एकूण व्याज उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत राहिले तर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही. एफडी व्याजावर अवलंबून असलेल्यांवरील कराचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.
advertisement
5/7
लॉटरीवर टीडीएस : सरकारने लॉटरीशी संबंधित टीडीएस नियम सोपे केले आहेत. पूर्वी, एका वर्षात एकूण जिंकलेली रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस कापला जात असे. आता 10 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाल्यावरच टीडीएस कापला जाईल.
advertisement
6/7
इन्शुरन्स कमीशन : इन्शुरन्स कंपन्या, एजंट आणि दलाल यांना आता हायर टीडीएस मर्यादेचा लाभ मिळेल. विमा कमिशनवरील टीडीएस लिमिट 15 हजार रुपयांवरून 20 हजार रुपये करण्यात आली आहे.
advertisement
7/7
म्युच्युअल फंड आणि शेअर्स : म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता हायर एग्जेम्पशन लिमिट चा लाभ मिळेल. डिव्हिडेंड इन्कमवर टीडीएसची मर्यादा 5 हजार रुपयांवरून 10 हजार रुपये करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
1 एप्रिलपासून लागू होणार नवा TDS रुल, FD-RD मधील गुंतवणुकदारांना मिळेल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल