Mumbai Weather : झटपट शेकोटी पेटवावी लागणार! मुंबईचा पारा घसणार, कसं असेल आठवड्यातलं हवामान
Last Updated:
Mumbai Weather Update : मुंबईत पुढील आठवड्यात तापमानात लक्षणीय घट होणार असून रात्रीचे तापमान 16°C पर्यंत खाली जाईल, दिवसात तापमान 32°C राहील.
advertisement
1/7

मुंबईत पुढील आठवड्यात तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईतील किमान तापमान सुमारे 22°C च्या आसपास आहे. मात्र येत्या काही दिवसांत हवामान कसं असेल याबाबत सविस्तर एकदा जाणून घेऊयात.
advertisement
2/7
भारताच्या हवामान विभागाने दिलेल्या पंचदिवसीय हवामान अंदाजानुसार, पुढील आठवड्याच्या सुरूवातीपासून शहरात थोडी थंड हवेचा अनुभव होईल. या अंदाजानुसार 12 डिसेंबरपर्यंत किमान तापमान सुमारे 16°C पर्यंत खाली जाऊ शकते.
advertisement
3/7
शनिवारी IMDच्या सांताक्रुझ ऑब्झर्वेटरीने किमान तापमान 22.9°C नोंदवले जे सासळी साधारण 2.9°C जास्त आहे तर कोलाबा ऑब्झर्वेटरीने 23.4°C नोंदवले जे साधारण 1°C जास्त आहे. शहरातील कमाल तापमान तुलनेने जास्त राहिले जे सुमारे 34°C पर्यंत पोहोचले
advertisement
4/7
IMDने सांगितले की 7 डिसेंबरला किमान तापमान थोडे कमी होऊन सुमारे 21°C पर्यंत जाऊ शकते. 8 डिसेंबरपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरातील तापमान 20°C च्या खाली जाऊ शकते. 12 डिसेंबरपर्यंत ही घट अधिक तीव्र होईल आणि रात्रीचे तापमान सुमारे 16°C पर्यंत खाली येऊ शकते.
advertisement
5/7
दिवसभर तरी तापमान तुलनेने उष्ण राहील आणि कमाल तापमान 32°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.मुंबईत पुन्हा थंडीचे वातावरण जाणवणार असून यामुळे काही दिवसांपासून उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल.
advertisement
6/7
सर्व पाहता पुढील आठवड्यात मुंबईत थंडी अनुभवायला मिळेल. रात्रीचे तापमान लक्षणीयरीत्या कमी होईल पण दिवसातलं तापमान अजूनही उबदार राहील. लोकांना थंड हवामानाचा अनुभव घेता येईल तसेच नागरिकांना जाकेट किंवा स्वेटर घालण्याची गरज भासू शकते. हवामानातील हा बदल काही काळासाठी राहत राहील आणि मुंबईकरांना हिवाळ्याच्या सुरुवातीस थंड वातावरणाचा आनंद देईल.
advertisement
7/7
पुढील आठवड्यात मुंबईत रात्रीचे तापमान १६°C पर्यंत खाली जाईल. दिवस ३२°C पर्यंत उबदार राहील, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थोडी थंडी जाणवेल आणि शहरात थंड हवेचा अनुभव मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather : झटपट शेकोटी पेटवावी लागणार! मुंबईचा पारा घसणार, कसं असेल आठवड्यातलं हवामान