आगीचे उंच लोळ अन् धूर....पुण्यातल्या भरवस्तीत अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारे 5 PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पुण्यातील सदाशिव पेठेतील रमेश डाईंग या प्रसिद्ध दुकानात भीषण आग लागली, गोडाऊनमधील माल जळून खाक, जीवितहानी नाही, कारण अद्याप अस्पष्ट.
advertisement
1/6

अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील भरवस्तीत दिवसाढवळ्या भयंकर आगीनं रौद्र रुप धारण केलं. काही क्षणात संपूर्ण आग टेरेससह आसपासच्या दुकानांमध्ये पसरली. सदाशिव पेठेत गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.
advertisement
2/6
पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या रमेश डाईंग या प्रसिद्ध दुकानाला आज सव्वा बारा वाजता भीषण आग लागली.दुकानाच्या शेवटच्या मजल्यावर ज्या ठिकाणी दुकानाचा गोडाऊन आहे त्या ठिकाणी आग लागल्यामुळे दुकानातील साहित्य जळून खाक झाले.
advertisement
3/6
शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू तसेच रेनकोट जॅकेट वस्तूंचे हे प्रसिद्ध दुकान आहे. सुदैवाने दुकानातील कुठल्याही कर्मचाऱ्याला यामध्ये काही झालं नाही.
advertisement
4/6
अग्निशमन दलाच्या पाच ते सहा वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र आठ मोठी असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोळ पाहायला मिळाले आहेत. अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
advertisement
5/6
आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र उचं आगीचे अन् धुराचे लोळ दिसत होते. खालून लोकांनी या आगीचे व्हिडीओ फोटो काढायला सुरुवात केली. या आगीमध्ये गोडाऊनमधील माल जळून खाक झाला आहे.
advertisement
6/6
आगीचे हे फोटो अंगावर शहारे आणणारे आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहेत. या फोटोंवरुन आगीची भीषणता लक्षात येईल, सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आगीचे उंच लोळ अन् धूर....पुण्यातल्या भरवस्तीत अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारे 5 PHOTO