TRENDING:

Vastu Shastra : घराच्या मुख्य दरवाजासाठी कोणती दिशा सर्वात शुभ? पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण? जाणून घ्या वास्तुशास्त्राचं मत

Last Updated:
अनेक लोक घर घेताना किंवा बांधताना वास्तुचे नियम काटेकोरपणे पाळतात, तर काहीजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण वास्तु तज्ञ सांगतात की घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला नसेल तर त्याचा थेट परिणाम घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.
advertisement
1/9
घराच्या मुख्य दरवाजासाठी कोणती दिशा सर्वात शुभ? पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण?
भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्र हे केवळ घर बांधणीपुरते मर्यादित नाही, तर ते जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकवून ठेवण्यासाठीही महत्त्वाचे मानले जाते. आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि घरातील प्रत्येक गोष्ट दरवाजा, स्वयंपाकघर, देवघर, खिडक्या यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो, असा अनेकांचा विश्वास आहे.
advertisement
2/9
अनेक लोक घर घेताना किंवा बांधताना वास्तुचे नियम काटेकोरपणे पाळतात, तर काहीजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण वास्तु तज्ञ सांगतात की घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला नसेल तर त्याचा थेट परिणाम घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. कारण मुख्य दरवाजातूनच लक्ष्मीदेवीचा प्रवेश होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
advertisement
3/9
मग प्रश्न असा उभा रहातो की घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा आणि त्याच्याशी संबंधित कोणते नियम लक्षात ठेवावेत? चला जाणून घेऊ या वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशांचा अर्थ आणि त्यामागील तर्क.
advertisement
4/9
घराच्या मुख्य दरवाजाची शुभ दिशावास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ईशान्य (उत्तर-पूर्व) किंवा पूर्व-पश्चिम दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रवेशद्वार पश्चिम दिशेच्या मधोमध असेल तर तोही समृद्धीचा सूचक मानला जातो. अशा घरात सुख, शांती आणि धनाचा वास असल्याचे मानले जाते.दरवाज्याचा आकार फार लहान किंवा फार मोठा नसावा, तर तो संपूर्ण इमारतीच्या आकाराच्या प्रमाणात असावा. कारण असंतुलित आकार घरात अस्थिरता आणतो, असे वास्तु सांगते.
advertisement
5/9
स्वयंपाकघराच्या दरवाजाची दिशाघरातील समृद्धी आणि आरोग्याचा संबंध स्वयंपाकघराशी जोडला जातो. त्यामुळे स्वयंपाकघराचा दरवाजा उत्तर, पश्चिम किंवा आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. उत्तर आणि पश्चिम दिशा सकारात्मक ऊर्जेसाठी सर्वोत्तम मानल्या जातात.जर या दोन दिशा शक्य नसतील, तर आग्नेय दिशा योग्य ठरते कारण ती अग्नि तत्वाशी संबंधित आहे जे स्वयंपाकघरासाठी योग्य आहे.
advertisement
6/9
घराच्या दरवाज्यावर काय बांधावे?वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्यावर काही शुभ वस्तू बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते.तुळसीची सुकलेली मुळं, मीठाची पोटली, मंगल कलश किंवा आंब्याच्या पानांचे वंदनवार या वस्तू दरवाज्यावर लावल्याने धनप्राप्ती, आरोग्य आणि घरातील सौख्य वाढवतात असे मानले जाते.
advertisement
7/9
मुख्य दरवाजासमोर काय ठेवू नये?मुख्य दरवाजासमोर कधीही कचरा, तुटलेले दगड, जुनी वस्तू किंवा सांडपाणी नसावे. अशा गोष्टींमुळे घरात नकारात्मकता आणि दरिद्रता येते. लक्ष्मीदेवी नेहमी स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठिकाणी निवास करतात, त्यामुळे मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा.
advertisement
8/9
दरवाजा सजवण्याचे महत्त्वघरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी दरवाजा नेहमी आकर्षक आणि सजवलेला ठेवावा. मुख्य दरवाज्यावर ‘ॐ’, ‘स्वस्तिक’ किंवा धातूची नेमप्लेट लावणे शुभ असते. मोठ्या घंटीऐवजी मधुर आवाजाची डोरबेल वापरणे चांगले मानले जाते. कारण मधुर ध्वनी वातावरणातील ऊर्जा संतुलित ठेवतो.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu Shastra : घराच्या मुख्य दरवाजासाठी कोणती दिशा सर्वात शुभ? पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण? जाणून घ्या वास्तुशास्त्राचं मत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल