TRENDING:

'सूर्याला कॅप्टन्सीवरून काढा', T20 वर्ल्ड कपआधी गांगुलीने बॉम्ब टाकला, नव्या कॅप्टनचं नावही सांगितलं!

Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही सीरिज अत्यंत महत्त्वाची आहे, पण या सीरिजआधी सौरव गांगुलीच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.
advertisement
1/7
'सूर्याची कॅप्टन्सी काढा', वर्ल्ड कपआधी गांगुलीचा बॉम्ब, नव्या कॅप्टनही सांगितला
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. त्याआधी टीम इंडिया फक्त 10 सामने खेळणार आहे. यातले 5 सामने दक्षिण आफ्रिका आणि उरलेले 5 न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत.
advertisement
2/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये ज्या 15 खेळाडूंची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे, त्याच खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपसाठीही संधी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-20 फॉरमॅटमध्ये खेळत आहे.
advertisement
3/7
टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपची गतविजेती आहे. 2024 साली भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, त्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं.
advertisement
4/7
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याने मात्र टी-20 वर्ल्ड कप तोंडावर असताना सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सीवरून हटवण्याची मागणी केली आहे. याचसोबत गांगुलीने नव्या टी-20 कर्णधाराचं नावही सुचवलं आहे.
advertisement
5/7
इडन गार्डनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सौरव गांगुलीला भारताच्या टी-20 कर्णधाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कॅप्टन असावा असं उत्तर दिलं आहे. माझ्या मते शुभमन गिलला तिन्ही फॉरमॅटमध्ये कॅप्टन्सी दिली गेली पाहिजे, असं गांगुली म्हणाला.
advertisement
6/7
'3 महिन्यांपूर्वीचं शुभमन गिलची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी बघा. विराट आणि रोहितसारखे दिग्गज नसतानाही त्याने एका युवा टीमचं उत्कृष्ट पद्धतीने नेतृत्व केलं. तो बॅटिंग आणि कॅप्टन्सीमध्ये चमकला', असं वक्तव्य गांगुली म्हणाला.
advertisement
7/7
'3 महिन्यांआधी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूवर पुढच्या 3 महिन्यात खराब कामगिरी झाली म्हणून टीका करणं योग्य नाही. कर्णधार म्हणून त्याला योग्य वेळ मिळाली पाहिजे, तोपर्यंत त्याला समर्थन करणं गरजेचं आहे. घाईमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे कायमच नुकसान होतं, त्यामुळे गिलला कर्णधार म्हणून वेळ दिला पाहिजे', अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'सूर्याला कॅप्टन्सीवरून काढा', T20 वर्ल्ड कपआधी गांगुलीने बॉम्ब टाकला, नव्या कॅप्टनचं नावही सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल