TRENDING:

IND vs SA : 'रोहित क्रिकेट खेळताना मी शाळेत जायचो...', वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचं मोठं विधान

Last Updated:
या सामन्याआधी एका वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने मोठं विधान केलं आहे. जेव्हा रोहित शर्मा 2007 चा टी20 वर्ल्डकप खेळत होता, तेव्हा मी शाळेत जायचो,असे विधान त्याने केलं आहे.
advertisement
1/7
'रोहित क्रिकेट खेळताना मी शाळेत जायचो...', वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचं मोठं विधान
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातला दुसरा वनडे सामना हा उद्या 3 डिसेंबर 2025 ला खेळवला जाणार आहे. हा सामना शहिद वीर नारायण सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना पार पडणार आहे.
advertisement
2/7
या सामन्याआधी एका वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने मोठं विधान केलं आहे. जेव्हा रोहित शर्मा 2007 चा टी20 वर्ल्डकप खेळत होता, तेव्हा मी शाळेत जायचो,असे विधान त्याने केलं आहे. दरम्यान हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आहे. बावुमाला असा विश्वास आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याविरुद्ध खेळणे हा नवीन अनुभव नसला तरी, त्यांची उपस्थिती भारतीय संघाला निश्चितच बळकटी देते.
advertisement
4/7
''त्या (विराट-रोहित) दोघांचा समावेश संघाला बळकटी देतो. मालिकेच्या सुरुवातीला आम्ही म्हटल्याप्रमाणे, हे असे दोन खेळाडू आहेत ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आणि भरपूर कौशल्य आहे आणि त्यामुळे संघालाच फायदा होऊ शकतो. ही अशी गोष्ट नाही जी आम्हाला माहिती नाही''असे बावुमा म्हणाला.
advertisement
5/7
''आम्ही रोहितविरुद्ध खेळलो... मला वाटतं 2007मध्ये टी20 विश्वचषक होता, मी तेव्हाही शाळेत होतो. म्हणजे, हे लोक तिथे होते, त्यामुळे नवीन काहीही नाही. हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत,असे कौतुक टेम्बा बावुमाने केले.
advertisement
6/7
अशा खेळाडूंना तोंड देणे हा खेळाचा एक भाग आहे आणि स्पर्धा अधिक रोमांचक बनवतो.(त्यांच्याविरुद्ध येणे) काही नवीन नाही, आम्हाला त्याचा सामना करावा लागला आहे. आम्ही वाईट टप्प्यावर होतो. पण त्यांच्याविरुद्ध आमचा चांगला काळही गेला आहे,असे बावुमाने सांगितले.
advertisement
7/7
''आमच्यापैकी काही जण थोडे जुने होत आहेत, म्हणून आम्ही भारताविरुद्ध आणखी चार सामन्यांची कसोटी मालिका करण्यासाठी जास्त वेळ घालवणार नाही,''असे बावुमा म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'रोहित क्रिकेट खेळताना मी शाळेत जायचो...', वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचं मोठं विधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल