TRENDING:

IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध सामन्यातून अभिषेक शर्माला वगळणार? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं

Last Updated:
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा मागच्या तीन सामन्यांपासून शुन्यावर बाद होत आहे. त्याची ही खेळी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
advertisement
1/8
अभिषेक शर्माला टीम इंडियातून वगळणार? आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी कोचने स्पष्टच
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सूपर 8 मध्ये येत्या रविवारी 22 फेब्रुवारी 2026 ला भारताचा सामना साऊथ आफ्रिकेविरूद्ध होणार आहे.
advertisement
2/8
या सामन्यासाठी टीम इंडिया मैदानात कसून सराव करते आहे. या दरम्यानच एक मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
3/8
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा मागच्या तीन सामन्यांपासून शुन्यावर बाद होत आहे. त्याची ही खेळी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
advertisement
4/8
ग्रुप स्टेजमध्ये ही गोष्ट चालून गेली पण आता सूपर 8 मध्ये टीम इंडीयाचे सामने हे बलाढ्य संघांशी आहेत. अशापरिस्थितीत अभिषेक शर्माला खेळवायचं की नाही? असा प्रश्न होता.
advertisement
5/8
यावर आता टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने मोठं विधान केलं आहे. मॉर्केलने अभिषेक शर्माला वगळण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
advertisement
6/8
अभिषेक शर्माबद्दल संघात अजिबात चर्चा नाही आहे. तो संघासाठी चांगली खेळी करण्याच्या प्रयत्नात आहे. तो नेट सरावा दरम्यान मैदाना चांगली फलंदाजी करतो आहे, असे देखील मॉर्ने मॉर्केलने सांगितलं आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा संघात कायम राहणार आहे.
advertisement
7/8
दरम्यान अभिषेकच्या तीन डकनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तो मैदानात स्थिरावण्याऐवजी मोठे फटके मारण्याचा खूप प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.
advertisement
8/8
अभिषेक शर्मा एक चांगला खेळाडू आहे, पण त्यांच्यावर अपेक्षांचा भार पडतो आहे. जर त्याने अमेरीकेविरूद्ध चांगली सूरूवात केली असती तर परिस्थिती वेगळी असती, आता मोठा सिक्स हिट करणारा अव्वल फलंदाज असण्याचे दडपण दिसून येते, असे देखील गावस्कर म्हणाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध सामन्यातून अभिषेक शर्माला वगळणार? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल