IND vs SA : टेस्ट-वनडेनंतर आता T20 चा थरार! कधी, किती वाजता सुरू होणार मॅच? इथे पाहा शेड्यूल
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली टेस्ट सीरिज आफ्रिकेने 2-0 ने जिंकली तर वनडे सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने विजय झाला. आता दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे.
advertisement
1/7

फेब्रुवारी महिन्यात भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्यासाठीची तयारी म्हणून दोन्ही टीम या सीरिजकडे पाहत आहेत. टी-20 सीरिजसाठी भारतीय टीममध्ये बरेच बदल झाले आहेत. विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराहचं कमबॅक झालं आहे, तर हार्दिक पांड्याही दुखापतीतून बरा झाल्यामुळे टीममध्ये आला आहे.
advertisement
2/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट आणि वनडे सीरिजला मुकलेला शुभमन गिल टी-20 सीरिज खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-20 सीरिज खेळण्यासाठी मैदानात उतरेल. मागच्या काही काळात भारताचं टी-20 मधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, पण दक्षिण आफ्रिकेला हलक्यात घेऊन चालणार नाही.
advertisement
3/7
मंगळवार 9 डिसेंबरपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. पहिला सामना कटकमध्ये होईल. तर दुसरी टी-20 11 डिसेंबरला चंडीगढमध्ये, तिसरी टी-20 14 डिसेंबरला धर्मशाला, चौथी टी-20 17 डिसेंबरला लखनऊ आणि पाचवी टी-20 मॅच 19 डिसेंबरला अहमदाबादमध्ये होईल.
advertisement
4/7
भारतीय वेळेनुसार पाचही सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत. पाचही सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टारवर केलं जाईल.
advertisement
5/7
वनडे सीरिजप्रमाणेच टी-20 मध्येही टॉस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारतामध्ये या कालावधीमध्ये रात्री दव पडतं, त्यामुळे बॉलिंग करणं कठीण होतं, त्यामुळे कॅप्टन टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घ्यायची शक्यता आहे.
advertisement
6/7
भारतीय टीम : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर
advertisement
7/7
दक्षिण आफ्रिकेची टीम : एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमेन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिकॉक, डोनेवन फरेरा, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को यानसन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, लुथो सिपामला, ट्रिस्टन स्टब्स
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : टेस्ट-वनडेनंतर आता T20 चा थरार! कधी, किती वाजता सुरू होणार मॅच? इथे पाहा शेड्यूल