IND vs SA : तब्बल 6 दिवसानंतर ICC ला लक्षात आली टीम इंडियाची चूक, 11 खेळाडूंवर कारवाईचा बडगा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
ICC Action On Team India : रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल सोमवारी भारताला त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आलाय.
advertisement
1/5

भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळवण्यात आला होता. अतितटीच्या या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं. अशातच आता या सामन्यात टीम इंडियाने मोठी चूक केली.
advertisement
2/5
मैदानात दव जास्त असल्याने बॉलर्सला अवघड परिस्थितीचा सामना करावा लागत होता. अशातच टीम इंडियाने वेळेत बॉलिंग संपवली नाही. अशातच 6 दिवसानंतर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.
advertisement
3/5
आयसीसीच्या खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 चं उल्लंघन टीम इंडियाने केलं आहे. त्यामुळे टीम इंडियावर म्हणजेच संपूर्ण 11 खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
4/5
रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल सोमवारी भारताला त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आलाय.
advertisement
5/5
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा दोन ओव्हर कमी टाकल्यामुळे मॅच रेफरींच्या एलिट पॅनेलचा भाग असलेले रिची रिचर्डसन यांनी हा दंड ठोठावला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : तब्बल 6 दिवसानंतर ICC ला लक्षात आली टीम इंडियाची चूक, 11 खेळाडूंवर कारवाईचा बडगा!