TRENDING:

Rohit-Virat नंतर आणखी एका 'स्टार' प्लेअरचा टी 20 क्रिकेटला रामराम, वर्ल्ड कपपूर्वीच तडकाफडकी घोषणा!

Last Updated:
यामुळे तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आले. या ऐतिहासिक कामगिरी नंतर कॅप्टन रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर विराट कोहलीने देखील या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आता न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
advertisement
1/7
रोहित-विराट नंतर आणखी एका 'स्टार' प्लेअरचा टी 20 क्रिकेटला रामराम!
टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेला हरवून 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. बार्बाडोस येथे झालेल्या फायनल सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून विजय मिळवला.
advertisement
2/7
यामुळे तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आले. या ऐतिहासिक कामगिरी नंतर कॅप्टन रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
advertisement
3/7
फायनल सामन्यात विराटने 59 बॉलमध्ये 76 धावांची कामगिरी केली. यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना विराटने आपला हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप आहे असे जाहीर करून यानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता या पाठोपाठ आणखी एका स्टार खेळाडूने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
advertisement
4/7
न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडणार आहे.
advertisement
5/7
आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना केन विल्यमसन म्हणाले, "क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ आहे. आठवणी आणि अनुभवांसाठी मी अविश्वसनीयपणे आभारी आहे.
advertisement
6/7
विल्यमसन म्हणाले, "मिशेल सँटनर हा एक उत्कृष्ट कर्णधार आहे. त्याने त्याच्या नेतृत्व क्षमता दाखवून दिल्या आहेत. आता या फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड संघाला उंचावण्याची वेळ आली आहे आणि मी त्यांना दूरवरून पाठिंबा देत राहीन.
advertisement
7/7
केन विल्यमसनने 2011 मध्ये न्यूझीलंडकडून टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघाच्या यादीत एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्याने 93 टी 20 सामन्यांमध्ये 2,575 धावा केल्या आहेत, ज्यात 18 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या 95 आहे. जरी त्याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit-Virat नंतर आणखी एका 'स्टार' प्लेअरचा टी 20 क्रिकेटला रामराम, वर्ल्ड कपपूर्वीच तडकाफडकी घोषणा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल