मुंबईची पैसे वसूल डिल!,2 कोटीच्या खेळाडूने राडा केला, W,W,W,W,W... BCCI ला दिला सिग्नल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर पालघर एक्सप्रेस अर्थात शार्दुल ठाकूर यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. कारण मुंबईने त्याला ट्रेंड विंडोमध्ये लखनऊकडून खरेदी केले होते.
advertisement
1/7

2/7
दरम्यान आयपीएलपुर्वी शार्दुल ठाकूर सघ्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेत मुंबई संघाच कर्णधारपद मिळाल्यापासून तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसतो आहे.आता आसाम विरूद्ध खेळताना त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे.
advertisement
3/7
आसाम विरूद्ध गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेतले आहे. त्यामुळे आसाम संघाला त्याने जबरदस्त धक्का दिला होता.
advertisement
4/7
शार्दुल ठाकूरने पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर डेनिश दासला सूर्यकुमार यादवद्वारे कॅच आऊट केले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर अब्दुल खुरेशीला एलबीडब्ल्यू आऊट केले.
advertisement
5/7
त्यानंतर शार्दुल ठाकूरने पाचव्या बॉलवर रियान परागला सर्फराज खानद्वारे कॅ आऊट केले.अशाप्रकारे शार्दुल ठाकूरने तीन विकेट घेऊन आसामची अवस्था बिकट केली होती.
advertisement
6/7
शार्दुल इतक्यावर थांबला नाही तर पुन्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने सुमित घाडीगावकरला अवघ्या 1 धावावर हार्दिक तामोरेच्या हातात कॅट आऊट केले होते.त्यानंतर त्याने चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर निहार डेकाला कॅच आऊट केले होते.
advertisement
7/7
अशाप्रकारे एकट्या शार्दुलने 5 विकेट घेऊन आसामचा अर्धा संघ तंबुत पाठवला होता. त्याच्यानंतर आसामचा डाव 122 वर ऑलआऊट झाला आणि मुंबईने हा सामना 98 धावांनी जिंकला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मुंबईची पैसे वसूल डिल!,2 कोटीच्या खेळाडूने राडा केला, W,W,W,W,W... BCCI ला दिला सिग्नल