भारत-दक्षिण आफ्रिकेत कोण कुणावर भारी? T20 वर्ल्ड कपचे धडकी भरवणारे आकडे!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ग्रुप स्टेज संपल्यानंतर आता टी-20 वर्ल्ड कप खरा रंगात येणार आहे, कारण सुपर-8 स्टेजच्या थरारक सामन्यांना सुरूवात होत आहे. टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या टीम आहेत.
advertisement
1/9

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजमध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. रविवार 22 फेब्रुवारीला या दोन्ही टीम आमने-सामने येतील. 2024 टी-20 वर्ल्ड कप फायनलची पुनरावृत्ती या निमित्ताने होणार आहे.
advertisement
2/9
ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या 4 ही मॅच जिंकल्या, त्यामुळे सुपर-8 स्टेजच्या पहिल्या सामन्यातही दोन्ही टीमचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे तर दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व एडन मार्करमकडे आहे.
advertisement
3/9
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या ग्रुप डी मधल्या तीनही मॅच अहमदाबादमध्येच खेळल्या आहेत. तर भारताने त्यांच्या ग्रुप ए मधली नेदरलँड्सविरुद्धची शेवटची मॅच अहमदाबादच्या मैदानात खेळली.
advertisement
4/9
अहमदाबादची खेळपट्टी स्पिन बॉलरना मदत करणारी आहे. भारताकडे कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती हे तीन स्पिनर आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला कर्णधार एडन मार्करम आणि केशव महाराजकडून अपेक्षा असेल.
advertisement
5/9
अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे, कारण अभिषेक शर्माला या वर्ल्ड कपमध्ये अजून एकही रन करता आलेली नाही. 3 सामन्यांमध्ये अभिषेक तिन्ही वेळा शून्य रनवर आऊट झाला. याशिवाय तिलक वर्माला चांगली सुरूवात मिळूनही मोठा स्कोअर करता येत नाहीये.
advertisement
6/9
याआधी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 2024 टी-20 वर्ल्ड कपची फायनल झाली होती, तेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 रननी पराभव केला होता आणि टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली होती.
advertisement
7/9
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 7 मॅच झाल्या आहेत, यातल्या 5 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे तर फक्त 2 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला आहे.
advertisement
8/9
भारतीय टीम : अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
advertisement
9/9
दक्षिण आफ्रिकेची टीम : एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, क्विंटन डिकॉक, ट्रिस्टन स्टब्स, रेयान रिकलटन, केशव महाराज, कगिसो रबाडा, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
भारत-दक्षिण आफ्रिकेत कोण कुणावर भारी? T20 वर्ल्ड कपचे धडकी भरवणारे आकडे!