पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील आळंदी-दिघी रोड परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात ३७ वर्षीय नितीन गिलबिले नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर अशी हल्लोखोरांची नाव आहे. अमित पठारे याने नितीन गिलबिले यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली.
अधिक माहिती अशी की, आळंदी-दिघी रोड चाऱ्होली चौकात ही घटना घडली. नितीन गिलबिले हे चौकातून जात होते. त्यावेळी त्यांनी आपली फॉर्च्युनर रस्त्याच्या बाजूला लावली. कारमध्ये अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांच्याशी चर्चा करत होते. त्यावेळी अमित पठारे याने गिलेबिले यांच्या डोक्यात गोळी झाडली. नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडून हल्लेखोर फरार झाले. या गोळीबारात नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
advertisement
गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉर्च्युनरची पाहणी केली असता पोलिसांनी घटनास्थळावरून दोन रिकामी काडतुसं सापडली. दोन राऊंड फायर करण्यात आले होते. या हल्ल्यात गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गिलेबिले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. दिघी पोलिसांनी सध्या घटनेची नोंद घेतली आहे. तसंच फरार असलेल्या 2 संशयित आरोपीचा कसून शोध घेतला जात आहेत. गिलबिले यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. अद्याप हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
