नेमका अपघात कसा झाला?
हा अपघात कोरेगाव पार्क परिसरातील बंड गार्डनर मेट्रो स्टेशनजवळ पहाटेच्या सुमारास झाला. अतिशय वेगात असलेली ही कार रस्त्यावरील डिव्हायडरला धडकून अनियंत्रित झाली आणि थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातात ऋतिक भंडारे आणि यश भंडारे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद
अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या फुटेजमधून कारचा वेग किती भयानक होता, याचा अंदाज येतो. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
'ड्रिंक अँड ड्राईव्ह'ची शक्यता
कारचा वेग पाहता कार चालवणारे तरुण मद्यपान करून गाडी चालवत होते का? हा अपघात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' मुळे झाला आहे का? या दिशेने बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत. सध्या पोलीस अपघाताचे नेमके कारण, कारचा वेग किती होता, तसेच मद्यप्राशनाचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा कसून तपास करत आहेत.
