पुणे : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय असलेले व्यावसायिक समीर पाटील यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध कोर्टात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल केला असून याबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समीर पाटलांविरोधात कोणतीही वक्तव्य करू नका, अशा सूचना रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाने दिल्या सूचना दिल्या आहेत. समीर पाटलांनी दंगेकरांनी विरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला होता. या दाव्यावर सुनावणी होताना धंगेकरांना न्यायालयाने सूचना दिल्या आहेत.
advertisement
रवींद्र धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना समीर पाटील यांच्यावरही गंभीर आरोप करत आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात बोलताना धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी पुरावे म्हणून काही फोटो आणि माहिती समोर आणली होती. मात्र या आरोपांचा कोणताही ठोस संदर्भ किंवा पुरावा नसल्याचा दावा करत समीर पाटील यांनी धंगेकरांचे आरोप हे राजकीय स्वार्थापोटी केलेले असल्याचे म्हटले आहे.
अब्रुनुकसानीसाठी ५० कोटी रुपयांची नोटीस
धंगेकर यांच्या आरोपानंतर 14 ऑक्टोबर रोजी समीर पाटील यांनी धंगेकर यांना अब्रुनुकसानीसाठी ५० कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. त्यानंतर पाटील यांनी पुणे जिल्हा न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला आणि दिवाणी खटलाही दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे.
नेमक्या काय सूचना दिल्या?
दरम्यान समीर पाटलांनी केलेल्या आरोपांवर धंगेकरांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. त्यामुळे न्यायालयात धंगेकरांनी त्यांची बाजू मांडली नसल्याच समीर पाटलांचं म्हणणं आहे. त्यानंतर न्यायालयाने हा खटला चालू असेपर्यंत समीर पाटलांविरुद्ध कोणतेही वक्तव्य नका अशा सूचना दिल्या आहेत
