जागतिक स्पर्धेसाठी रस्ते दुरुस्ती
पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही जागतिक दर्जाची सायकलिंग स्पर्धा जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, वेल्हा आणि पुरंदर या महत्त्वपूर्ण तालुक्यांमधून जातो. स्पर्धेसाठी हा मार्ग सुस्थितीत असणे आवश्यक असल्याने, मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि आवश्यक डागडुजी करण्यात येणार आहे.
advertisement
या कामामुळे खेडशिवापूर-कोंढणपूर-डोणजे/सिंहगड घाटरस्त्याचा वापर करणाऱ्या स्थानिक नागरिकांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणताही अपघात टाळण्यासाठी राजगड पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
प्रवासासाठी बाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी रस्त्याच्या स्थितीची माहिती घ्यावी आणि १५ डिसेंबर पर्यंत या मार्गावर प्रवास करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
