TRENDING:

बिबट्याचे हल्ले वाढले, वन विभागाने घेतला मोठा निर्णय, आता...

Last Updated:

Leopard Attack : बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

पुणेपुणे जिल्ह्यातील शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नेमका हा निर्णय कोणता आहे आणि कशा प्रकारे नागरिकांना याचा फायदा होणार आहे ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

advertisement

पुणे जिल्ह्यात वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. जो 24 तास कार्यरत ठेवण्यात येत आहे. त्यातच नागरिकांसाठी मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक 18003033 जारी करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

advertisement

शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातून गेल्या महिनाभरात या भागांतून तब्बल 17 बिबटे पकडण्यात आले आहेत. पकडलेले सर्व बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. बिबट्याचे मानवांवर वाढत्या हल्ल्याचे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीला जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, तसेच प्रादेशिक आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

advertisement

बैठकीदरम्यान अतिसंवेदनशील गावांमध्ये एआय प्रणाली, सोलार नाईट सर्व्हिलन्स ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स आणि साउंड अलर्ट सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जुन्नर वनविभागाकडे 262 पिंजरे आहेत आणि आणखी पिंजरे तयार करण्याचे काम सुरू आहे. बाहेरील जिल्हे आणि राज्यांमधून साधारण 700 पिंजरे पुरवणाऱ्या एजन्सीकडून खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

advertisement

ग्रामस्तरावर सहनियंत्रण समित्या तयार करण्यात येणार आहेत. या समित्यांमध्ये अनुभवी लोक, वन आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांचा समावेश असेल. त्या गावात ड्रोनच्या मदतीने बिबट्यांची संख्या तपासतील, गस्त वाढवतील आणि नागरिकांमध्ये जनजागृती करतील.

सद्यस्थितीत माणिकडोह बिबट निवारण केंद्रात 50 बिबट्यांची क्षमता आहे. तसेच पोलिस अधीक्षकांच्या स्तरावर टायगर सेलची बैठक घेऊन वनविभाग आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या सर्व उपाययोजनांमुळे बिबट हल्ल्यांवर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी व्यवस्था निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

मराठी बातम्या/पुणे/
बिबट्याचे हल्ले वाढले, वन विभागाने घेतला मोठा निर्णय, आता...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल