प्राथमिक माहितीनुसार, नितीन गिलबिले हे संध्याकाळी च-होली चौकातून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. गोळीबारात गिलबिले गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणात जुने वाद, आर्थिक व्यवहार किंवा स्थानिक गटांतील वैर ही शक्यता पोलिस तपासत आहेत.
advertisement
नागरिकांमध्ये प्रचंड संताप
पोलिसांनी घटनास्थळावरून काही रिकामे काडतुसे जप्त केली असून गुन्हे शाखेची पथकं हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी रवाना झाली आहेत. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गेल्या काही महिन्यात शहरात अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास युद्धपातळीवर करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी होत आहे.या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी सावट गडद झालं आहे.
