'पूप स्कूप' वापरा, अन्यथा दंड भरा
कोथरूड परिसरात सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सकाळच्या वेळी डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण आरोग्य कोठी, लेन क्रमांक १०, १३, कमिन्स रस्ता, गोपीनाथ नगर, कुमार परिसर, एकलव्य कॉलेज परिसर, आशिष गार्डन डी. पी. रस्ता आणि गाढवे कॉलनी यांसारख्या प्रमुख भागांमध्ये राबविण्यात आली.
advertisement
या मोहिमेदरम्यान, श्वान मालकांना त्यांच्या पाळीव श्वानांनी केलेल्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी 'पूप स्कूप' वापरण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले. अनेक श्वान मालकांना प्रत्यक्ष भेटून, नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
लग्नाचा मुहूर्त चुकला, एसटी महामंडळावरच झाली कारवाई, तब्बल इतका दंड, कारण...
या कारवाईदरम्यान, जे श्वान मालक नियम मोडताना आढळले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कारवाई करताना काही श्वान मालकांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. अशावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी हुज्जत न घालता, त्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरीच्या माध्यमातून शांतपणे नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावले.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
