पुणे: पिंपरी-चिंचवडमधील नेहरू नगर परिसरातील H.A. Corner गार्डन याठिकाणी विविध राज्यांतील वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात काश्मिरी स्पेशल शालींचे स्टॉल विशेष आकर्षण ठरत आहे.याठिकाणी असणारी तब्बल 1 लाख 75 हजार रुपये किंमतीची शाल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही शाली पाहण्यासाठी पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.या काश्मिरी शालींबाबत माहिती समीर यांनी लोकल 18 ला दिली आहे.
advertisement
समीर यांनी सांगितलं की काश्मिरी शालींबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. विशेषता पश्मिना शाल रिंग पास होते पण प्रत्यक्षात खरी पश्मिना शाल कधीच रिंग पास होत नाही. पश्मिना हा अतिशय नाजूक आणि हलका तंतू असला, तरी त्याची विण अतिशय घट्ट आणि बारकाईने केलेली असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची रिंग किंवा अंगठी त्यातून सर्रासपणे पास होणे शक्य नसते.या प्रदर्शनात अनेक प्रकारांच्या काश्मिरी शाली पाहायला मिळतात. याठिकाणी ठेवलेली 1 लाख 75 हजार रुपये किंमतीची शाल तयार करण्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी लागला आहे. ही शाल पूर्णपणे हाताने बनवलेली आहे.
या ठिकाणी पश्मिना, कानी, सोझनी आणि जामावर अशा पारंपरिक शाली येथे ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी असणाऱ्या सर्व शाली हाताने तयार केल्या आहेत. काही शालींवर तर वर्षभर काम करण्यात आलं आहे. येथे 500 रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंतच्या शाली उपलब्ध आहेत.काश्मीर शाल म्हणून अनेक ठिकाणी नागरिकांची फसवणूक केली जाते.याठिकाणी ओरिजिनल काश्मिरी शाली खरेदी करण्याची संधी पुणेकरांना मिळणारं आहे. हे प्रदर्शन 8 डिसेंबर पर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे.