दिल्लीत निवडणूकीपुर्वीच समझोता
दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक होऊन यात मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेण्याचं ठरवण्यात आलं. बैठकीत निर्णय निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोघंही सत्तेत असल्याने एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतीये. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूकीपुर्वीच समझोता झाल्याचं समजतंय. यामध्ये प्रफुल्ल पटेलांची दिल्ली शिष्टाई फळाला आल्याची माहिती कळतीये.
advertisement
प्रत्येकी दोन-दोन वर्ष अध्यक्षपद
महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्यासोबत मुरलीधर मोहोळ यांनाही संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाकडून समझोत्याचा प्रस्ताव आल्याची माहिती समोर आली आहे. अध्यक्षपदाच्या एकुण कार्यकाळात अर्धा-अर्धा कार्यकाळ दोघांनाही मिळणार म्हणजेच अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांना प्रत्येकी दोन-दोन वर्ष अध्यक्षपद मिळेल. निवडणूकीपुर्वी मित्रपक्षाशी समझोपाता झाल्यानं अजित पवारांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भेट
निवडणूक झालीच असती तर? संभवित धक्का समजून घेत राष्ट्रवादीकडून दिलेला 2-2 वर्ष अध्यक्षपदाचा प्रस्ताव भाजपनं स्विकारला आहे. अध्यक्षपदाबाबतचा निर्णय आज, शनिवारी होण्याची शक्यता आहे. मोहोळ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घेतील.
विद्यमान सचिवांना जामीन मंजूर
दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनी 2017 ते 2021 आणि 2021 ते 2025 या कालावधीसाठी सादर करण्यात आलेला बदल अहवाल फेटाळला आहे. यानंतरही ही निवडणूक घेतली जात आहे. त्यानंतर नेमके काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचे विद्यमान सचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आर्थिक अपहार केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना या प्रकरणात शुक्रवारी जामीन मंजूर झाला आहे.
