विमानांचे उड्डाण विलंबाने होत आहे. तर, इतर विमान कंपन्या तिकीट दरांमध्ये अवाजवी वाढ करून प्रवाशांची अडवणूक करत आहेत. यामुळे कंपन्यांच्या कामासाठी निघालेले कर्मचारी, परीक्षार्थी विद्यार्थी तसेच उपचारांसाठी प्रवास करणारे रुग्ण नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करत आहेत. अशा अनेक त्रस्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती.
Weather Alert: हाडं गोठवणारी थंडी! पुणे-मुंबईत वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, रविवारी पुन्हा अलर्ट
advertisement
मध्य रेल्वे, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी सत्रानुसार दरवर्षी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन असतेच. परंतु यंदाच्या अचानक वाढलेल्या मागणीमुळे तातडीने दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यानुसार, पुणे ते बेंगळुरू ही रेल्वे शनिवार, ६ डिसेंबर रोजी रात्री सात वाजता आणि पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) ही दुसरी रेल्वे रविवार, ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या गरजेनुसार आणखी गाड्यांचे नियोजन केले जात आहे. मध्य रेल्वेने नागपूर, मुंबई, पुणे या मार्गांवरून विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच, मडगाव, नागपूर, बेंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या प्रमुख स्थळांना जोडणाऱ्या अनेक फेऱ्या असलेल्या विशेष गाड्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
