TRENDING:

Pune News: सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजून दोघांना केलं बेशुद्ध; मग 6 लाखाची चोरी, पुण्यातील घटना

Last Updated:

चोरट्यांनी दोन व्यक्तींना शीतपेयातून (सॉफ्ट ड्रिंक) गुंगीकारक औषध पाजून बेशुद्ध केलं. यानंतर त्यांच्याकडील ५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : चोरीच्या अनेक घटना रा्ज्यभरातून रोज समोर येतात. यात पुणेही मागे नाही. आता नुकतंच शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात चोरट्यांनी दोन व्यक्तींना शीतपेयातून (सॉफ्ट ड्रिंक) गुंगीकारक औषध पाजून बेशुद्ध केलं. यानंतर त्यांच्याकडील ५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केला आहे. याप्रकरणी, हांडेवाडी येथील एका २८ वर्षीय तरुणाने या फसवणुकीबद्दल बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यात अजब चोरी
पुण्यात अजब चोरी
advertisement

शीतपेयात मिसळले गुंगीचे औषध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी येथे राहणारे २८ वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले दुसरे व्यक्ती हे काही कामासाठी बाहेर होते. याच दरम्यान, दोन चोरट्यांनी त्यांना गाठलं. चोरट्यांनी त्यांना सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीकारक औषध मिसळून दिलं. त्यामुळे काही वेळातच दोघेही बेशुद्ध झाले. दोघेही रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहून, चोरट्यांनी त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरी केली. यामध्ये तब्बल ५ लाख ६६ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज, रोख रक्कम आणि इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत.

advertisement

या गुंगीकारक औषधाच्या परिणामातून बाहेर आल्यानंतर फिर्यादीने तातडीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारे अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ किंवा शीतपेय टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नर्तिकेवर पैसे उधळण्यासाठी चोरी -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि मक्याची पुन्हा दर वाढ, कांद्याला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

नुकतीच पुण्यातून आणखी एक चोरीची अजब घटना समोर आली होती. यात नर्तिकेच्या कार्यक्रमांवर आणि नाच-गाण्यावर पैसे उधळण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने मोठं कांड केलं. त्याने थेट आपल्या शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असं आहे. त्याने होळकरवाडी येथीलच रहिवासी आणि शेजारी असलेल्या अभिजित पठारे यांच्या घरी घरफोडी केली. अभिजित पठारे हे विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले असताना, राहुलने संधी साधून त्यांच्या घरातून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी केले. या दागिन्यांची किंमत अंदाजे ६ लाख १४ हजार रुपये आहे. अभिजित पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजून दोघांना केलं बेशुद्ध; मग 6 लाखाची चोरी, पुण्यातील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल