पुणे जिल्ह्यातून सध्या चार राष्ट्रीय महामार्ग आणि काही राज्य मार्ग जातात. त्यामुळे क्यूआर कोड प्रणालीचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या नव्या उपक्रमामुळे प्रवासादरम्यान मदत मिळवणे अधिक सोपे होईल, तसेच महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे.
मुंबईत गेमचेंजर प्रकल्प, दादरची वाहतूक कोंडी सुटणार, असा पूल पहिल्यांदाच होणार...
advertisement
क्यूआर कोडची होर्डिंग्ज कुठे लावणार?
प्रवाशांना हे क्यूआर कोड सहज दिसावेत यासाठी टोल प्लाझा, विश्रांतीस्थळे, ट्रक ले-बाय क्षेत्रे तसेच महामार्गाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या ठिकाणी ही होर्डिंग्ज बसवली जाणार आहेत. या डिजिटल उपक्रमामुळे महामार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर होईल. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तत्काळ मदत मिळू शकेल, तसेच संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची माहितीही या कोडमधून पाहता येणार आहे.
एकाच स्कॅनवर सर्व माहिती उपलब्ध
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता मार्गावरील जवळची रुग्णालये, पेट्रोलपंप, रेस्टॉरंट, पोलिस ठाणे, वाहन दुरुस्तीची केंद्रे आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स यांची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक सेवा शोधणे अधिक सोपे होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतही लवकर उपब्धत होणार आहे.






