बाबा आढाव यांनी रिक्षाचालक, हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम मजूर, बाजार समित्यांतील कामगार अशा असंघटित श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी निर्णायक लढे उभे केले. माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ साकारण्यात त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
हरायचं नाही! शेतकऱ्याने म्हशी पालनातून काढला श्रीमंत होण्याचा मार्ग, आता महिन्याला इतकी कमाई
अंत्यदर्शनासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शिवनेरी रोड आणि मार्केटयार्ड परिसरातील मुख्य रस्त्यांचा शक्यतो वापर टाळावा, असे पोलिसांनी सांगितले.
पर्यायी मार्ग
1. गंगाधाम चौक – नेहरू रोड – सेवन लव्ह चौक मार्गे आवश्यक ठिकाणी प्रवास.
2. गंगाधाम चौक – चांद्रलोक चौक – सातारा रोड मार्गे इच्छित स्थळी पोहोचता येईल.
पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात केली असून नागरिकांनी सहकार्य करून वाहतूक सुरळीत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






