पुणे : पुण्यातील सर्वात जुन्या गुन्हेगारी टोळ्या पैकी एक असलेल्या आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर नातवाच्या हत्येप्रकरणी सध्या जेलमध्ये आहे. आंदेकर टोळीला गजाआड केल्यानंतर पुण्यातील टोळीयुद्ध शमल्याचा पुणे पोलीसांचे म्हणणे होते. परंतु पोलिसांना थेटपणे कृतीतून आव्हान देऊन वनराज आंदेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या समीर काळेच्या भावाची कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे बंडू आंदेकर तुरुंगात असताना बाहेर सूत्र कोण हलवत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
पुण्यातील कोंढव्यात पिस्तूलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आला आहे. गणेश काळे असे खून झालेल्याचे नाव आहे. गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. त्यामुळे या खुनाला टोळी युद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्यावर्षीय वनराज यांचा गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत खून केला होता. वनराज यांच्या खूनात वापरलेली पिस्तुल समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते.
कोंढव्यात नेमकं आज काय घडलं?
आज दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात २ आरोपींनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळे याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळे याला लागल्या. तो गतप्राण झाला. त्याचवेळी दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर कोयत्याचे वार केले. काही मिनिटांतच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोन आरोपी गणेशच्या मागावर होते. त्यांनी गणेशला रिक्षात बसू दिले, काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशला लक्ष्य केले. गणेश काळे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी आहे. तो अजूनही तुरूंगात आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पुण्यात पुन्हा एकदा गँगवार
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात गणेशविसर्जनाच्या पुर्वसंध्येला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा आंदेकर टोळीने खून केला होता. त्यानंतर आता समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा खून झाला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवार तर भडकले नाही ना असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
हे ही वाचा :
