एकीकडे ग्रुप एमधल्या सुपर-4 च्या दोन्ही टीम निश्चित झाल्या असल्या तरी ग्रुप बीच्या 2 टीम मात्र गुरूवारी निश्चित होणार आहेत. गुरूवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात ग्रुप बी मधील लढत होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेचा विजय झाला तर श्रीलंका आणि बांगलादेश या दोन टीम सुपर-4 मध्ये प्रवेश करतील. पण अफगाणिस्तानने विजय मिळवला तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या ज्या 2 टीमचा नेट रनरेट चांगला असेल, त्या टीम सुपर-4 मध्ये जातील.
advertisement
टीम इंडियाच्या 3 सामन्यांच्या तारखा
ग्रुप ए मधून टीम इंडिया शुक्रवारी त्यांचा शेवटचा सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी भारतीय टीम सुपर-4 मध्ये ग्रुप ए मधून पहिल्या क्रमांकावर प्रवेश करणार आहे, त्यामुळे टीम इंडियाचे सुपर-4 मधील सामन्यांच्या तारखाही निश्चित झाल्या आहेत, पण ग्रुप बी मधून कोणत्या 2 टीम येणार हे निश्चित नसल्यामुळे भारतीय टीमला कोणाविरुद्ध खेळायचं आहे, ते अजून समजलेलं नाही.
सुपर-4 मधील टीम इंडियाच्या मॅच
21 सप्टेंबर, रविवार- भारत विरुद्ध पाकिस्तान- दुबई
24 सप्टेंबर, बुधवार- भारत विरुद्ध बी 2- दुबई
26 सप्टेंबर, शुक्रवार- भारत विरुद्ध बी 1- दुबई
सुपर-4 मधल्या टॉप 2 टीम या रविवार 28 सप्टेंबरला आशिया कपची फायनल खेळतील. फायनलचा सामनाही दुबईमध्येच खेळवला जाणार आहे.