Rohit Sharma News: टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली यांना बीसीसीआयने एक फर्मान पाठवलं आहे.यामध्ये दोन्ही सिनिअर खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर आता रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे.रोहित शर्माने हा निर्णय बोर्डाला देखील कळवल्याची माहिती आहे.त्यामुळे रोहित शर्माने नेमका काय निर्णय घेतला आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यामुळे दोन्ही खेळाडू सध्या वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहेत. पण या फॉरमॅटमध्ये खेळताना बीसीसीआयने दोन्ही सिनिअर खेळाडूंना एक फर्मान बजावलं आहे. त्यानुसार जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकातून वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही विजय हजारे ट्रॉफी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्या, असे बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटने दोघांना कळवलं आहे.
दरम्यान आता बीसीसीआयच्या या फर्माननंतर रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला त्याबाबत कळवले देखील आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माचा हा निर्णय बीसीसीआयने पाठवलेल्या फर्माननंतर आला आहे. ज्यामध्ये सिनिअर खेळाडूंची टीम इंडियात स्थान कायम ठेवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे गरजेचे असणार आहे. भविष्यातील वनडे सिरीज आणि 2027 वनडे वर्ल्ड कप लक्षात ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहितने 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबई संघाच्या मोहिमेत सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका त्यापूर्वी संपेल, म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली तोपर्यंत मोकळे असतील. पुढील एकदिवसीय मालिका 11 जानेवारी रोजी सुरू होईल, जेव्हा भारत न्यूझीलंडशी सामना करेल.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध जबरदस्त कामगिरी
दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली. रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले, तर विराट कोहलीने सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये नाबाद 87 धावा केल्या होत्या.
रोहित सध्या मुंबईतील शरद पवार इनडोअर अकादमीमध्ये सराव करत आहे आणि त्याने संकेत दिला आहे की तो सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी देखील उपलब्ध असेल. कोहली सध्या लंडनमध्ये आहे, परंतु बोर्डाला आशा आहे की तो भारतात परत येईल आणि देशातर्गंत क्रिकेटमध्ये खेळेल.
गेल्या हंगामात, दोघांनीही रणजी ट्रॉफी सामना खेळला. कोहली 12 वर्षांनी दिल्लीसाठी खेळला तर रोहित 19 वर्षांनी मुंबईसाठी खेळला. त्यावेळी रोहित म्हणाला होता की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अथक वेळापत्रकामुळे देशांतर्गत क्रिकेटसाठी वेळ काढणे कठीण होते, परंतु आता परिस्थिती बदलली आहे.
बीसीसीआयचा संदेश स्पष्ट
टीम इंडियामध्ये राहणे आता केवळ नावावर किंवा विक्रमावर अवलंबून राहणार नाही, तर खेळाडूच्या घरच्या मैदानावर धैर्य दाखवण्याच्या तयारीवर अवलंबून असेल. जर कोहली आणि रोहित तिथे खेळले तर ते भारतीय क्रिकेटसाठी एक मजबूत उदाहरण निर्माण करेल.
