ईसीबीकडे रिफंड मागितला असता...
बॉथम याने तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) चाहत्यांना तिकीटाचे पैसे रिफंड करावेत, अशी थेट मागणी केली आहे. जर मी इंग्लंडचा समर्थक असतो आणि इथे येण्यासाठी पैसे दिले असते, तर मी ईसीबीकडे रिफंड मागितला असता, असं बॉथम याने म्हटलं आहे. इंग्लंडचा सध्याचा संघ अॅशेस सिरीजसाठी तयारच नाही. मला नाही वाटत की टीमचे बॉलर फिट आणि मजबूत आहेत, असंही इयान बॉथम म्हणालाय.
advertisement
सिरीजच्या लायकीची नाही
इयान बॉथम याने इंग्लंडच्या या कामगिरीबद्दल बोलताना टीमच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केला. ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेससाठी आलेली टीम या सिरीजच्या लायकीची नाही, असं म्हणत त्याने खळबळ उडवून दिली आहे. पिंक बॉल कसोटीत खेळण्याचा काहीतरी अनुभव घेऊन येणे आवश्यक होते, पण टीम पूर्णपणे निष्काळजी दिसत आहे, असंही तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियाची रणनिती इंग्लंडवर भारी
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मैदानात इंग्लंडच्या खेळाडूंचा दम निघताना पहायला मिळतोय. इंग्लंडची बॉलिंग लाईन अप आता पाहुण्या संघासाठी चिंतेचा विषय आहे. तर आता बॅटिंगमध्ये देखील जो रूट वगळता इतर कोणाला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाची रणनिती इंग्लंडवर भारी पडताना दिसत आहे.
