टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का
शिवम दुबे याने त्यांच्या कारकिर्दीत एक असा अविश्वसनीय विक्रम नोंदवला होता जो जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला जमलेला नाही. शिवम दुबेच्या उपस्थितीत टीम इंडियाने सलग 37 मॅचमध्ये पराभव स्वीकारला नव्हता. हा विक्रम 2019 ते 2025 या कालावधीत कायम होता. या कालावधीमधील मॅचमध्ये भारताने फक्त विजयच नाही तर T20 क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केलं होतं. अशातच मेलबर्नवरील पराभवासोबतच आता टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का आहे. शिवम दुबेच्या उपस्थितीत टीम इंडियाचा पहिल्यांदाच पराभव झालाय.
advertisement
6 वर्षानंतर पहिल्यांदाच...
जेव्हा जेव्हा शिवम दुबे टीम इंडियामध्ये होता, तेव्हा तेव्हा टीम इंडियाने कधीही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. 6 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हा विक्रम डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या T20I मॅचनंतर सुरू झाला होता. या 37 मॅचच्या काळात भारताने 34 मॅचमध्ये विजय मिळवला, एक मॅच टाय झाली आणि दोन मॅच अनिर्णित राहिल्या होत्या.
टीमसाठी 'लकी चार्म' ठरला अनलकी
दरम्यान, शिवम दुबे याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि ऑलराऊंडर योगदानामुळे संघात एक चांगला बॅलन्स आला होता, ज्यामुळे तो टीमसाठी 'लकी चार्म' बनला होता. शिवम दुबे यांचा हा विक्रम अखेर ऑस्ट्रेलियाने संपुष्टात आणला. मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या T20I मॅचमध्ये भारताला 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला, आणि दुबे यांची सलग 37 मॅचची अपराजित मालिका खंडीत झाली.
