India vs South Africa 1st T20I : कटकच्या बाराबती स्टेडिअमवर रंगलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेला अवघ्या 74 धावांवर ऑलआऊट करून 101 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह आता भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या एका विकेटवरुन मोठा वाद पेटला आहे. जसप्रीत बुमराहने टाकलेला बॉल नो होता आणि त्याच बॉलवर भारताला विकेट मिळाली आहे. त्यामुळे मोठा वाद पेटला आहे.
advertisement
खरं तर भारताने दिलेल्या 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेची सूरूवात खराब झाली होती. कारण सलामीवीर क्विटन डिकॉक शुन्यावर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ एडम मार्करम 14 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर ट्रिस्टन स्टब्स देखील 14 वर बाद झाला.
साऊथ आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्राविस एकमेव खेळाडू होता जो उत्कृष्ट खेळत होता. तसेच टीम इंडियाविरूद्ध मोठी खेळी केली अशी अपेक्षा असताना जसप्रीत बुमराहने त्याला 11 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सूर्यकुमार यादवच्या हातात कॅच आऊट केले. खरं तर ज्या बॉलवर डेवाल्ड ब्राविस आऊट झाला तो खरं तर नो बॉल होता. थंड अंपायरने हा बॉल चेक देखील केला होता, पण हा बॉल नो बॉल नसल्याचा दाखला अंपायरने दिला होता. पण तरी देखील या विकेटवरून वाद पेटला आहे आणि फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान डेवाल्ड ब्राविस 22 धावा करून बाद झाला होता. त्याच्यानंतर इतर खेळाडू काही फारशा धावा करू शकले नाही. एकेरी दुहेरी धावा काढून देखील ते आऊट झाले त्यामुळे साऊथ आफ्रिकेचा डाव 74 धावांवर ऑल आऊट झाला होता.अशाप्रकारे भारताने 101 धावांनी हा सामना जिंकला होता.
भारताकडून अर्शदिप सिंह, जसप्रीत बुमराह, वरून चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट घेतले होते. तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
तसेच भारताकडून हार्दिक पांड्याच्या नाबाद 59 धावांच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 175 धावा ठोकल्या होत्या. साऊथ आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 3 सिपामालाने 2 आणि डोनोवन फरेराने एक विकेट घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
