खरं तर सामन्याच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजने 6 ओव्हर टाकल्या होत्या. या ओव्हरमथ्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.त्यामुळे शुभमन गिल प्रचंड नाराज झाला होता.त्यानंतर त्याने मोहम्मद सिराजला ओव्हर देणे टाळले होते. साधारण खूप वेळ त्याने सिराजला ओव्हरच दिली नव्हती. त्यामुळे तो देखील निराश झाला होता. पण नंतर त्याने शुभमन गिलकडे विनंती केली. मला एक ओव्हर दे त्यानंतर त्याला ओव्हर मिळाली.
advertisement
दरम्यान ओव्हर मिळाल्यानंतर देखील तो संघर्षच करत होता. कारण त्याला पुढच्या तीन ओव्हर विकेट मिळाली नाही. पण नंतर त्याने 10 व्या ओव्हरला 2 विकेट काढल्या होत्या. सिराजने 45 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. सिराजने वेरीनेला एलबीडब्ल्यू तर मार्को जॅनसनला शुन्यावर बाद केले होते.अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या होत्या.
सामना संपल्यानंतर काय म्हणाला?
पहिला दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला की,नवीन चेंडू बॅटवर चांगला येत होता, पण जेव्हा चेंडू मऊ झाला तेव्हा उसळीही कमी झाली. माझी मानसिकता पूर्ण आणि स्टंपवर गोलंदाजी करण्याची होती. काही रिव्हर्स स्विंग ऑफरमध्ये होते, जर तुम्ही स्टंप-टू-स्टंप गोलंदाजी केली तर तुम्हाला विकेट घेण्याचे पर्याय मिळतील आणि फलंदाजांना धावा करणे सोपे नाही. एका टोकाला फलंदाजी करणे चांगले असते, तर दुसऱ्या टोकाला - उसळी बदलते आणि धावा करणे कठीण असते,असे सिराज म्हणाला.
पुढे सिराजने बुमराहने दिलेल्या सल्ल्याची माहिती दिली. जस्सी भाईंनी मला सांगितले की विकेट घ्यायचा असेल तर तुला स्टंम्पवर बॉल टाकावा लागेल, असे केलंस तर तुला एलबीडब्ल्यूवर विकेट मिळेल किंवा कॅचेस जातील असे त्याने सांगितले.त्यामुळे त्याचा सल्ला मानल्यानंतर सिराजने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या.
