सिराजच्या हातात बॉल सोपवला अन्...
पहिल्या एका तासात साऊथ अफ्रिकेने चांगली सुरूवात केली अन् 10 ओव्हरमध्ये एकची विकेट गमावली नव्हती. अशातच बुमराहने आपली रिव्हर्स स्विंगची ताकद दाखवली अन् पहिल्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. त्यानंतर कुलदीपने मनगटाची जादू दाखवली. कुलदीपने दोन महत्त्वाचे विकेट्स काढल्या. त्यानंतर शुभमनला आपला हुकमी एक्का आठवला. शुभमनने सिराजच्या हातात बॉल सोपवला.
advertisement
फाटलेल्या बुटासह बॉलिंग
मोहम्मद सिराजने त्याच्या 10 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स काढल्या अन् टीम इंडियाला पहिल्याच दिवशी मोठी आघाडी तयार करून दिली आहे. मात्र, सिराजच्या विकेटपेक्षा त्याच्या फाटलेल्या बुटाची चर्चा होताना दिसतीये. फाटलेल्या बुटासह मोहम्मद सिराज मैदानात उतरलेला दिसला. फाटलेल्या बुटासह त्याने साऊथ अफ्रिकेविरुद्ध बॉलिंग केली. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सिराजने फाटलेला बुट का घातला?
फास्ट बॉलर्ससाठी बॉल टाकताना 'लँडिंग फूट'वर सर्वात जास्त ताण येतो. 'डिलिव्हरी स्ट्राईड'च्या वेळी बुटाच्या बोटांच्या भागावर इतका जबरदस्त 'इम्पॅक्ट' होतो की तो भाग अनेकदा फाटून जातो. मात्र, अनेक बॉलर्स जाणूनबुजून बुटाचा तो भाग फाटू देतात किंवा सैल ठेवतात, कारण यामुळे त्यांच्या बॉलिंग अॅक्शनमध्ये सुधारणा होते. बुटाचा बोटाकडील भाग (Toe Box) फाटलेला किंवा मऊ झाल्यामुळे पाय सर्फेसवरून अधिक सहजपणे ओढला जातो. यामुळे बॉल टाकल्यानंतर 'फॉलो-थ्रू' करताना बॉलर्सला चांगली 'स्टॅबिलिटी' मिळते, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
सिराजने सांगितला होता पहिल्या बुटाचा किस्सा
आम्ही गावोगावी टेनिस बॉलने खेळायचो. मी 19 वर्षांचा होईपर्यंत चप्पल घालून खेळायचो. माझ्याकडे बूट नव्हते. बूट खरेदी करण्यासाठी पैसे लागतात ना? असं मोहम्मद सिराज मागील एका मुलाखतीत म्हटला होता. मला एका स्पर्धेत भाग घेण्यास सांगण्यात आले तेव्हा मला स्पाइक्स देण्यात आले होते, जे मी पहिल्यांदाच घातले होते, अशी आठवण देखील सिराजने सांगितली होती. अशातच आता सिराजचं शूज चर्चेत आला आहे.
