आता स्विप मारायला जाईल...
टेम्बा बावुमाला थोडंफार हिंदी येतं, हे ऋषभला माहिती होतं. स्टंपच्या मागून ऋषभने कुलदीपला टीप दिली. हा आता स्विप मारायला जाईल. याने आधीही असंच केलं आहे, असं ऋषभ पंत म्हणाला. त्यावेळी दोन्ही अतिरिक्त विकेटकीपर असलेल्या ध्रुव जुरैल आणि केएल राहुलला स्लिपला लावलं. त्यावेळी टेम्बाने बॉल डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात बॉल ध्रुव जुरैलच्या हातात पाठवला. त्यावर ध्रुवने कोणतीही चूक केली नाही.
advertisement
बॉल बॅटच्या कडाला लागला
डावाच्या 16 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवने टेम्बा बावुमाला बाद केलं. बावुमाने लेग स्टंपवर पिच केलेल्या स्पिन बॉलचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल उसळला, त्याच्या बॅटच्या आतील कडाला लागला आणि लेग-स्पिनर ध्रुव जुरेलच्या उजवीकडे गेला, ज्याने एक शानदार झेल घेतला. अशा प्रकारे कुलदीप यादवने भारताचे तिसरं यश निश्चित केलं.
बुमराहने सलामीवीर पाडले
दरम्यान, चांगली सुरूवात केल्यानंतर साऊथ अफ्रिकेची टीम ढेपाळली. जसप्रीत बुमराहने 11 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेला दुसरा झटका लागला. दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बुमराहनेच माघारी धाडलं होतं.
