खरं तर साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या डावापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार करायला सूरूवात केली होती. भारताच्या या प्रहाराला साऊथ आफ्रिकेच्या एकाही खेळाडूला उत्तर देता आलं नाही.त्यामुळे साऊथ आफ्रिकेचा डाव सूरूवातीपासूनच गडगडत गेला. शेवटी ज्यावेळेस 146 धावांवर आफ्रिकेची 6 वी विकेट पडली होती. इथून पुढे 13 धावा काढताना साऊत आफ्रिकेने 5 विकेट गमावल्या आहेत.त्यामुळे साऊथ आफ्रिकेचा खेला होबे झाला होता.
advertisement
याआधी साऊथ आफ्रिकेच्या डावाच्या सुरूवातीला एडन मार्करम आणि रिकेल्टन सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले होते.दोघांनी यावेळी सूरूवात चांगली केली होती पण त्यांना मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या. कारण मार्करम 31 वर तर रिकेल्टन 23 वर बाद झाला होता. मुल्डर 24 धावांवर, कर्णधार बावुमा 3 तर टोनी 24 वर बाद झाला होता.असे सुरूवातीचे पाच फलंदाज बाद झाले होते.
भारताकडून बुमराहने सर्वाधिक 5 विकेट, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.त्या
कोलकाता कसोटीसाठी भारताचे प्लेइंग 11: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
कोलकाता कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग 11: एडेन मार्कराम, रायन रिकेलटन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज
