साऊथ आफ्रिकेचे बॅटींग कोच अॅशवेल प्रिन्स यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली होती.या पत्रकार परिषदेत टेम्बा बावुमाला बुटका बोल्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर अॅशवेल प्रिन्स म्हणाले, बुमराह आणि पंत यांच्यात चर्चे दरम्यान जी कमेंट करण्यात आली होती, त्या संदर्भात साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती.
तसेच अॅशवेल प्रिन्स पुढे म्हणाले, नाही,यावर आमची कोणतीची चर्चा झाली नाही. पहिल्यांदाच माझ्या लक्षात आले आहे. तसेच जे घडले आहे, त्यात काही अडचण असेल असे वाटत नाही,असे म्हणत एकप्रकारे अॅशवेल प्रिन्सने हा वाद निरर्थक असल्याचे म्हणत प्रकरण मिटवलं आहे.
नेमका वाद काय?
खरं तर सामन्याच्या 13 व्या ओव्हर दरम्यान हा राडा झाला होता. याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सलामीवीर एडन मार्करम 31 वर तर रिकेल्टन 23 वर बाद केले होते. त्यानंतर कर्णधार बावुमा आणि मुल्डर मैदानात आला होता. यावेळी भारताकडून 13 वी ओव्हर घेऊन जसप्रीत बुमराह आला होता. त्यावेळी बावुमा स्ट्राईकवर होता.
बुमराहने त्याच्या पहिल्याच ब़ॉलला विकेट घेतली होती.त्यानंतर बावुमा स्ट्राईकवर असताना त्याने सलग चार बॉल त्याला डॉट करायला लावले होते.शेवटच्या बॉल बावुमाच्या पायाला लागला होता.त्यामुळे जसप्रीत बुमराह एलबीडल्यू अपील करू शकला असता.पण बुमराह थेट विकेटकिपर रिषभ पंतच्या जवळ गेला आणि म्हणाला 'तो बुटका आहे', यावर पंत म्हणतो, तो बुटका असला तरी त्याच्या पायाला लागलं आहे,असे तो अॅक्शन करून दाखवतो. पण उंचीमुळे प्रॉम्बेल होऊ शकतो पण तो बुटका आहे,असे जसप्रीत बुमराह शेवटी बोलला आणि अपील न करता निघून गेला.
त्याचं झालं असं की उंचीमुळे एलबीडल्यूच्या विकेटमध्ये थोडा फरक पढू शकला असता त्यात अंपायरने देखील त्याला आऊट दिलं नव्हतं.त्यामुळे रिव्ह्यू घ्यायचा की नाही? घेतला तर उंचीमुळे काही फरत पडेल का? याबाबत खेळाडू चर्चा करत होते.यामध्ये टेम्बा बावुमाला उंचीवरून डिवचण्याचा बुमराहचा कोणताही हेतून नव्हता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
कोलकाता कसोटीसाठी भारताचे प्लेइंग 11: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
कोलकाता कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग 11: एडेन मार्कराम, रायन रिकेलटन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज
