सहा लेफ्ट-हँड बॅटर्सना संधी
सध्या सुरू असलेल्या मॅचसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये तब्बल सहा लेफ्ट-हँड बॅटर्सना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या संख्येने डावखुऱ्या फलंदाजांना घेऊन मॅच खेळली नव्हती.
गंभीरचा धाडसी निर्णय
टीम इंडियाने चार स्पेशालिस्ट स्पिनर्स (कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर) घेऊन मॅच खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यामुळे बॅटिंग लाइन-अपमध्ये हा बदल आपोआप झाला आहे. डावखुऱ्या बॅटर्सची ही मोठी संख्या प्रतिस्पर्धी संघासाठी नक्कीच एक वेगळं चॅलेंज उभं करू शकतं. अशातच गंभीरच्या रणनितीबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
advertisement
सहा डावखुऱ्या बॅटर्स कोण?
प्लेइंग XI मध्ये असलेल्या या सहा डावखुऱ्या बॅटर्समध्ये यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. या आक्रमक सिलेक्शनमुळे टीम इंडियाने प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सवर मानसिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
गंभीरचा नवा पॅटर्न
दरम्यान, याआधी टीम इंडियाने 23 जुलै 2025 रोजी इंग्लंडविरुद्घच्या कसोटी सामन्यात पाच लेफ्ट हँडर क्रिकेटर खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता कोलकाताच्या मैदानावर गंभीरने लेफ्ट हँडर 6 खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाची (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (C), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
