विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवलं गेलं असलं, तरी ड्रेसिंग रूममध्ये मात्र वेगळ्याच खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार दिला गेला. टीम इंडियाचा बॅटिंग प्रशिक्षक रेयान टेनडस्काटे याने या पुरस्काराची घोषणा केली. बीसीसीआयने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला हा व्हिडिओ शेअर केला आहे.
'इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सीरिजची घोषणा करताना मला आनंद होतोय. सीरिजच्या तीनही सामन्यांमध्ये प्रत्येकाने योगदान दिलं, पण बॅटिंगने वर्चस्व गाजवलं. या सीरिजचा इम्पॅक्ट प्लेअर कुलदीप यादव आहे. कुलदीपने तिन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली', असं टीम इंडियाचा बॅटिंग कोच रेयान टेनडस्काटे म्हणाला. तसंच टेनडस्काटेने कुलदीप यादवचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मेडल देऊन गौरवही केला.
advertisement
कुलदीप यादवला ड्रेसिंग रूममध्ये हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा टीममधल्या सहकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. यानंतर कुलदीप यादवला दोन शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली तेव्हा विराटने 'रो दे रो दे' असं म्हणत निशाणा साधला. यानंतर कुलदीपने मला फार काही बोलायचं नाही, विराट भाई आणि जयस्वालचे धन्यवाद, त्याने आज उत्कृष्ट इनिंग खेळली, असं कुलदीप म्हणाला.
विराट खेळणार विजय हजारे ट्रॉफी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही वनडे सीरिज झाल्यानंतर विराट कोहली दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट आणि रोहित शर्माने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावं, असं निवड समिती, टीम इंडियाची मॅनेजमेंट आणि बीसीसीआयला वाटत आहे, त्यामुळे विराट विजय हजारे ट्रॉफी खेळताना दिसेल. 24 डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होत आहे.
