ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, निवड समिती सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये आसामचे नेतृत्व करणाऱ्या रियान परागचा विचार करत आहे. टीममधल्या त्याच्या समावेशाचे कोणतेही कारण उघड झालेले नाही, पण बॅटिंग क्रम वाढवण्यासाठी 15 सदस्यीय टीममध्ये रियान परागचा विचार केला जात असल्याचे मानले जाते.
टी-20 फॉरमॅटमध्ये रियान परागची अलिकडची कामगिरी फारशी उल्लेखनीय राहिलेली नाही. रियान पराग सध्या देशांतर्गत टी-20 स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या हंगामात, रियान परागने आसामसाठी चार टी-20 सामने खेळले आहेत आणि फक्त 34 रन केल्या आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात रियान परागला खातेही उघडता आले नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, रियान परागचा आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये सर्वाधिक रन 15 आहेत, ज्या त्याने छत्तीसगडविरुद्ध केल्या होत्या.
advertisement
रियान पराग गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळ टीम इंडियासाठी खेळला नाही. रियानने शेवटचा सामना ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये त्याने 34 रन केल्या होत्या. त्याच्या कारकिर्दीत त्याने टीम इंडियासाठी एक एकदिवसीय आणि नऊ टी-20 सामने खेळले आहेत.
