वॉशिंग्टन सुंदर तिसऱ्या क्रमांकावर
टीम इंडियाने आश्चर्यजनक निर्णय घेतला. साई सुदर्शन याला बाहेर बसून गौतम गंभीर याने वॉशिंग्टन सुंदर याला खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांना बुचकाळ्या पाडलं आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदर याला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग ऑर्डरमध्ये दाखवलं आहे. टीम इंडियामध्ये तीन ऑलराऊंडर तर चार स्पिनर्स आहेत. गंभीरला ऑलराऊंडरच्या जोरावर मॅच जिंकण्याचा मानस आहे.
advertisement
साऊथ अफ्रिका दोन स्पिनर्ससह मैदानात
विशेष म्हणजे, साऊथ अफ्रिकेने केशव महाराज आणि सायमन हार्मेर या फक्त दोन स्पिनर्ससह मैदानात उतरत आहे. लेफ्ट-आर्म स्पिनर सेनूरन मुथुसामी याने उत्कृष्ट बॅट आणि बॉलने प्रदर्शन केलं असतानाही, त्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताकडून दोन पेस बॉलर्सनाही संधी
दुसरीकडे, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत अक्षर पटेल यालाही टीममध्ये स्थान मिळाले आहे. अक्षरला टीममध्ये समाविष्ट करण्यासाठी साई सुदर्शनला बाहेर करण्यात आले असून, वॉशिंग्टन सुंदर आता टीमसाठी नंबर 3 वर बॅटिंग करताना दिसेल. भारताने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोन पेस बॉलर्सनाही संधी दिली आहे. यामुळे भारतीय टीमकडे एकूण सहा स्पेशालिस्ट बॉलर्स उपलब्ध आहेत, जे मॅचमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
