गंभीरची इच्छा पूर्ण केली नाही
गंभीरने मंगळवारी सकाळी बॅटिंग कोच सीतांशू कोटक यांच्यासोबत खेळपट्टीची पाहणी केली. भेटीदरम्यान त्याने सुजानशी दीर्घ चर्चा केली. पण सुजन मुखर्जी यांनी गंभीरची इच्छा पूर्ण केली नाही. सुजन मुखर्जी यांनी नकार दिल्याने गंभीर संतापला होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सुजन मुखर्जी यांनी माध्यमांशी बोलताना, अशी कोणतीही मागणी नसल्याचं म्हटलं.
advertisement
मागणी केली नाही, पण इच्छा आहे
दैनिक जागरणने सुजन यांना यावर प्रश्न केला होता. गंभीरने कोलकाता टेस्टसाठी स्पिनर्सला अनुकूल अशी खेळपट्टी मागितली होती का? असा सवाल केल्यावर सुजन यांनी तुटक उत्तर दिलं. गंभीरने अशी कोणतीही मागणी केली नाही, पण त्यांची इच्छा आहे, असं सुजन यांनी म्हटलं अन् वाद पेटला. प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रकरणात उडी घेतली अन् प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघ व्यवस्थापनाने अशी कोणतीही मागणी केलेली नाही, असं दादा म्हणाला.
अजिंक्य रहाणेचे आरोप
ईडनची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल मानली जात आहे आणि फिरकीपटूंच्या बळावर भारताने येथे अनेक सामने जिंकले आहेत. तर केकेआरचा माजी कॅप्टन अजिंक्य रहाणे याने देखील प्रेस कॉन्फरेन्समध्ये इडन गार्डनच्या पीच क्युरेटरवर आरोप केले होते. पीच क्युरेटर आपली बाजू ऐकून घेत नाहीत, असं अजिंक्य रहाणे याने म्हटलं होतं. अशातच आता गंभीर देखील क्युरेटरवर संतापल्याचं पहायला मिळालं आहे.
