कसा असेल पावसाचा अंदाज?
वुमेन्स वर्ल्ड कपचा फायनल सामना आज दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. एक्युवेदरच्या अंदाजानुसार, आज पावसाची शक्यता सुमारे 63 टक्के आहे, तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत ही शक्यता 50 टक्क्यांपर्यंत राहील. त्यामुळे आता पावसाने सर्वांचं टेन्शन वाढवलंय. याच मैदानावर भारत-बांगलादेशचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला होता. जर रविवारचा सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही, तर राखीव दिवस सोमवारी, 3 नोव्हेंबरला ठेवण्यात आला आहे. मात्र सोमवारी देखील नवी मुंबईत 55 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
सामना रद्द झाला तर विजयी कोण?
जर दोन्ही दिवस पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना संयुक्त विजेते (Joint Winners) घोषित करण्यात येईल. मात्र सामना व्हावा, अशी दोन्ही संघाची इच्छा आहे. भारताचा साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात भारताने 20 जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने 13 जिंकले. शिवाय, एक सामना अनिर्णित राहिला. नवी मुंबईतील सपाट खेळपट्टी फलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉन्ड्री लहान आहेत.
एक नवीन विजेता
दरम्यान, भारतीय महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरीने देशभरात आशा निर्माण केल्या आहेत आणि आता सर्वांच्या नजरा या ऐतिहासिक विजयावर आहेत. हिला विश्वचषकाचा हा अंतिम सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाशिवाय खेळला जाईल. याचा अर्थ या स्पर्धेत एक नवीन विजेता असेल. विजयी संघ इतिहास रचेल.
