TRENDING:

Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार? लखनऊचा खेळाडू येणार ताफ्यात, रिटेन्शनआधी मोठी डील

Last Updated:

मुंबई इंडिन्स अर्जुन तेंडुलकरला रिलीज करण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या जागी लखनऊच्या एका खेळाडूला ताफ्यात घेण्याची शक्यता आहे.अशाप्रकारची ट्रेडींग सध्या दोन्ही संघात सूरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 mumbai Indians arjun tendulkar
mumbai Indians arjun tendulkar
advertisement

Arjun Tendulkar Mumbai Indians : आयपीएल 2026 साठी सध्या जोमाने ट्रेडींग सूरू आहे.त्यातच 15 नोव्हेंबरला संघाना रिटेन्शन यादी जाहीर करायची आहे.त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडिन्स अर्जुन तेंडुलकरला रिलीज करण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या जागी लखनऊच्या एका खेळाडूला ताफ्यात घेण्याची शक्यता आहे.अशाप्रकारची ट्रेडींग सध्या दोन्ही संघात सूरू आहे.त्यामुळे ही डील पूर्ण होऊन अर्जून लखनऊला जातो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

खरं तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मागच्या सीझनच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्या बेस प्राइसवर खरेदी केले होते. पण अर्जुनने 2025 मध्ये एकही सामना खेळला होता. आता आयपीएल 2026 च्या आधी डिसेंबरमध्ये एक मिनी लिलाव पार पडणार आहे. ज्यामध्ये रिटेन्शन यादी 15 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. यात सर्व फ्रँचायझीने कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहे आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार आहे? याची माहिती देणार आहे. पण या रिटेन्शनआधीच मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला रिलीज करणार असल्याची बातमी सुत्रांकडून समोर येत आहे.

advertisement

अर्जुन तेंडुलकर आणि शार्दुल ठाकूर यांच्याबाबत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये ट्रेड सुरू आहेत,अशी माहिती क्रिकबझच्या वृत्ताने दिली आहे. तसेच वृत्तात म्हटले आहे की दोन्ही खेळाडूंची संभाव्य देवाणघेवाण शक्य आहे, जरी ती पूर्णपणे रोख हस्तांतरण असू शकते.

advertisement

आयपीएल व्यापार नियमांनुसार, फक्त बीसीसीआय अधिकृतपणे कोणत्याही हस्तांतरणाची घोषणा करू शकते, म्हणून कदाचित दोन्ही फ्रँचायझी टिप्पणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. मुंबई क्रिकेटच्या जवळच्या एका सूत्राने क्रिकबझला पुष्टी दिली की दोघांमध्ये ट्रेड होण्याची शक्यता आहे. आणि काही दिवसांतच घोषणा अपेक्षित आहे.

advertisement

गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात शार्दुल ठाकूर विकला गेला नाही, त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने त्याला 2 कोटींना बदली खेळाडू म्हणून त्यांच्या संघात घेतले. ठाकूरने 2025 च्या आवृत्तीत एकूण 10 सामने खेळले आणि 13 विकेट्स घेतल्या. ठाकूर चांगली फलंदाजी देखील करतो, जरी मागील आवृत्तीत त्याने बॅटने लक्षणीय योगदान दिले नसले तरी.

अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाले तर, त्याला मागील आवृत्तीत एकही सामना मिळाला नाही. अर्जुन पहिल्या हंगामापासून (2023) मुंबई संघात आहे, परंतु तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. 2023 मध्ये अर्जुनने 4 सामने खेळले, एकूण ३ विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये, त्याने फक्त 1 सामना खेळला, ज्यामध्ये त्याने एकही विकेट्स घेतली नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, कमाई तर पाहा
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार? लखनऊचा खेळाडू येणार ताफ्यात, रिटेन्शनआधी मोठी डील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल