चिन्नास्वामीचं आयपीएलमधून निलंबन
बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील (M. Chinnaswamy Stadium) चेंगराचेंगरीनंतर प्रकरणातील निलंबनामुळे हा महत्त्वपूर्ण बदल घडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बंगळुरूमध्ये 4 जून रोजी आरसीबीच्या विजयाच्या परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडियमचे आगामी आयपीएलमधून निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे, आगामी आयपीएल सीझनसाठी आरसीबीला त्यांचे होम सामने खेळण्यासाठी पर्यायी ठिकाण शोधावे लागत आहे.
advertisement
एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ म्हणाले...
या संभाव्य बदलाबाबत माहिती देताना, एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ (Kamlesh Pisal) यांनी सांगितले, "आरसीबीचे सामने पुण्यात घेण्याबद्दल चर्चा सुरू आहे, पण अद्याप त्याची खात्री नाही. कर्नाटकात चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे त्यांना स्टेडियमची समस्या आहे. त्यामुळे ते एका नव्या ठिकाणाच्या शोधात आहेत आणि आम्ही त्यांना आमचे स्टेडियम ऑफर केले आहे." टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नवीन होम बेस
पिसाळ पुढे म्हणाले की, 'सध्या प्राथमिक चर्चा सुरू असून काही तांत्रिक बाबींवर तोडगा काढणे बाकी आहे. जर सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या, तर कदाचित पुण्यात या मॅचेस होतील.' जर ही व्यवस्था निश्चित झाली, तर पुण्याच्या गहुंजे येथील एमसीए स्टेडियम हे आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा नवीन होम बेस (Home Base) ठरू शकते.
अधिकृत घोषणा नाही
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आयपीएल मधील होम सामने पुण्यात शिफ्ट करण्याबाबत बीसीसीआय (BCCI) किंवा आरसीबी फ्रँचायझीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
