आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबरला अबूधाबीमध्ये मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शन आधीच मुंबईची टीम संतुलित वाटत आहे. ऑक्शनमध्ये मुंबईची रणनीती काय असणार? हे त्यांच्या रिटेनशन लिस्ट वरून स्पष्ट होईल, त्यामुळे खेळाडू रिलीज करताना मुंबईला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.
मुंबई इंडियन्सचा रिटेनशन प्लान
आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारी मुंबई कशीबशी प्ले-ऑफला पोहोचली होती, कारण टीमची सुरूवात खराब झाली होती. यंदाच्या ऑक्शनआधी मुंबई त्यांच्या कोअर खेळाडूंना कायम ठेवेल हे निश्चित आहे, ज्यात जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, विल जॅक्स आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. लिलावाआधी मुंबई दीपक चहर आणि रीस टॉपलीला रिलीज करण्याचा निर्णय घेऊ शकते.
advertisement
रीस टॉपलीला मागच्या मोसमात खेळण्याची फार संधी मिळाली नव्हती. तर दीपक चहरलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मुंबई लिलावामध्ये कमी पैशात बॅकअपसाठी काही तरुण फास्ट बॉलर टीममध्ये घ्यायची शक्यता आहे. रिटेनशनची घोषणा करण्याआधी मुंबईने ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरला लखनऊ सुपर जाएंट्सकडून तर शरफेन रदरफोर्डला गुजरातकडून ट्रेड केलं आहे. ही दोन्ही डिल मुंबईने ऑल कॅश ट्रेड केली आहेत, त्यामुळे त्यांना काही खेळाडू रिलीज करावे लागणार आहेत.
मुंबईची संभाव्य रिटेनशन लिस्ट
हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, विल जॅक्स, रॉबिन मिन्झ, नमन धीर
मुंबईची संभाव्य रिलीज लिस्ट
दीपक चहर, रीस टॉपली, लिझार्ड विलियम्स, बेवॉन जेकब्स, सत्यनारायण राजू, श्रीजित कृष्णन, राज अंगद बावा, अर्जुन तेंडुलकर
ट्रेड केलेले खेळाडू
शार्दुल ठाकूर, शरफेन रदरफोर्ड
