सामना जिंकवून देणारी इनिंग
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायन मॅचनंतर तिला आलेल्या अडचणींचा तिने खुलासा केला आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील शानदार आणि सामना जिंकवून देणारी इनिंग खेळल्यामुळे तिचं नाव सर्वत्र गाजलं. मात्र, या यशामुळे तिला सोशल मीडिया आणि मोबाईलवर सतत येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसमुळे मोठी समस्या निर्माण झाली होती.
1000 हून अधिक व्हॉट्सॲप मेसेज
advertisement
जेमिमाच्या म्हणण्यानुसार, त्या महत्त्वपूर्ण विजयानंतर तिचा मोबाईल नंबर अनेक अनोळखी लोकांपर्यंत पोहोचला होता. या सततच्या 'हल्ल्यामुळे' तिचे लक्ष विचलित होऊ लागले. तिला जवळपास 1000 हून अधिक व्हॉट्सॲप मेसेज आले होते, ज्यामुळे तिला फायनलच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणं कठीण झाले. म्हणूनच, लक्ष विचलित होऊ नये म्हणून तिने व्हॉट्सॲप ॲप तात्पुरते अनइंस्टॉल करण्याचा निर्णय घेतला होता.
आजही इंस्टाग्राम स्क्रोल करते तेव्हा....
मी गंमत करत नाहीये, माझ्याकडे खरोखर सुमारे 1000 हून अधिक व्हॉट्सॲप मेसेजेस होते. म्हणून मी फायनलपूर्वी व्हॉट्सॲपपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला. अगदी जवळच्या लोकांना मी कळवले की गरज पडल्यास त्यांनी सामान्य कॉल किंवा मेसेजद्वारे संपर्क साधावा, असं जेमीमा म्हणाली. मी आजही इंस्टाग्राम स्क्रोल करते, तेव्हा अचानक माझेच व्हिडिओ समोर येतात. कोणी ना कोणी माझ्याबद्दल बोलतच असतं, असंही जेमीमा म्हणाली.
