टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले की, कुलदीप यादवने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रजा मागितली आहे. 'कुलदीपचे लग्न नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्याला किती दिवसांची रजा लागेल याचा विचार टीम व्यवस्थापन करेल', असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरच्या तणावामुळे आयपीएलमध्ये अनपेक्षित ब्रेक लागला, त्यामुळे कुलदीप यादवला त्याचे लग्न पुढे ढकलावे लागले.
advertisement
कुलदीप प्लेइंग इलेव्हनमध्ये
इंग्लंडचा माजी बॅटर केविन पीटरसनने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्स येथे होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये कुलदीप यादवचा समावेश करण्यास पाठिंबा दिला. वर्षातील चौथी टेस्ट खेळणाऱ्या कुलदीपने कोलकाता येथील पहिल्या टेस्टसाठी टीममध्ये आपले स्थान कायम ठेवले. त्याच्यासोबत अनुभवी ऑलराऊंडर रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी स्पिन बॉलिंग आक्रमण मजबूत केली आहे.
कुलदीप यादवने इतिहास रचला
कोलकाता टेस्टच्या पहिल्या डावात कुलदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या आणि स्वतःसाठी एक महत्त्वाचा विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150+ विकेट्स घेणारा कुलदीप तिसरा भारतीय डावखुरा स्पिन बॉलर ठरला. याचसोबत तो रवींद्र जडेजा आणि झहीर खान यांच्या यादीत सामील झाला. कुलदीप हा भारतात 150 विकेट्स घेणारा दुसरा डावखुरा स्पिन बॉलर आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा सोडून आला
कुलदीप यादव हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-20 सीरिज अर्धवट सोडून भारतात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजचा सराव करण्यासाठी कुलदीपला टीम मॅनेजमेंटने भारतात पाठवलं आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध अनधिकृत टेस्ट मॅच खेळायला सांगितलं, त्यामुळे कुलदीप या सामन्यात इंडिया ए कडून खेळला.
